---Advertisement---

अखेर सूर्यकुमार यादवची प्रतिक्षा संपली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व?

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 6:43 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघासह इतर अनेक परदेशी संघांचे खेळाडू सध्या संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यात व्यस्त आहेत. १० नोव्हेंबरला या हंगामातील अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे दोन्ही संघात कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. अद्याप या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही.

परंतु, भारतीय संघात काही प्रतिभावान युवा खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातही मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे नाव सर्वांच्या पुढे आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, सूर्यकुमारला वनडे किंवा टी२० संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. तो भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका निभावू शकतो. यावर्षीच्या आयपीएल हंगामात सूर्यकुमारचे फलंदाजी प्रदर्शन नावाजण्याजोगे राहिले आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यात १४८.१७च्या स्ट्राईक रेटने २४३ धावा केल्या आहेत. तर गेल्या २ आयपीएल हंगामात मिळून त्याने ४००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

सूर्यकुमार व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या नावाचाही यादीत समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

डू प्सेसिस सुपरमॅनच! विराट, डिविलियर्सचे घेतले भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

व्वा रे पठ्ठ्या! सीएसकेविरुद्ध विराट कोहलीची नवी भरारी, नोंदवला कुणीही न केलेला विक्रम

MIचं टेन्शन वाढलं! सलग दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा होऊ शकतो बाहेर

ट्रेंडिंग लेख-

IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ

कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---