---Advertisement---

डू प्सेसिस सुपरमॅनच! विराट, डिविलियर्सचे घेतले भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 6:05 PM
---Advertisement---

रविवारी(२५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएलचा ४४ वा सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसने शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात अफलातून ३ झेल घेतले आहेत. यातील देवदत्त पड्डीकलचा घेतलेला झेल जरी त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाडच्या नावावर लागला असला, तरी त्यासाठी त्याचे प्रयत्न अफलातून होते. डू प्लेसिसने पड्डीकल व्यतिरिक्त विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांचे झेल घेतले.

ऋतुराजसह पड्डीकलचा घेतला भन्नाट झेल

प्रथम फलंदाजी करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज पड्डीकलने मिशेल सँटेनर टाकत असलेल्या ७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र लाँग ऑनला गेलेला तो चेंडू डू प्लेसिसने पळत येऊन पकडला. पण त्याचा बाऊंड्री लाईनला स्पर्श होईल, म्हणून त्याने चपळाईने तो चेंडू जवळच असलेल्या ऋतुराजकडे फेकला. ऋतुराजनेही कोणतीही चूक न करता तो चेंडू झेलला. त्यामुळे पड्डीकलला २२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

https://twitter.com/Cric_life59/status/1320319654171013120

https://twitter.com/Rockybaai/status/1320315879947554816

https://twitter.com/razz_sanjeet/status/1320314596834631680

विराट, डिविलियर्सचेही घेतले अफलातून झेल

पड्डीकलनंतर डू प्लेसिसने त्याचा लहानपणीचा मित्र एबी डिविलियर्सचाही शानदार झेल घेतला. डिविलियर्सने दिपक चाहरने टाकलेल्या १८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळला. परंतु, तो चेंडू थेट बाऊंड्री जवळ उभ्या असलेल्या डू प्लेसिसच्या हातात गेला. त्यामुळे डिविलियर्स ३९ धावा करुन बाद झाला.

त्यानंतर सॅम करन गोलंदाजी करत असलेल्या १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेंगलोरचा कर्णधार विराटने लाँग ऑफच्या दिशेने जोरदार फटका मारला. यावेळी डू प्लेसिसने उजवीकडे उडी मारत शानदार झेल घेतला आणि विराटला ५० धावावंर बाद केले.

https://twitter.com/urmilpatel21/status/1320324441767858178

बेंगलोरने या सामन्यात विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद १४५ धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर चाहरने २ आणि सँटेनरने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; माजी भारतीय क्रिकेटरने शेअर केला फोटो

पड्डीकलच्या फलंदाजीचा ‘हा’ धुंरधर अष्टपैलू झाला चाहता; म्हणतोय, ‘तो तर सेम मॅथ्यू हेडन’

धोनीच्या ‘त्या’ एका सल्लाने बेंगलोरच्या गोलंदाजाचे बदलले आयुष्य

ट्रेंडिंग लेख –

कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

IPL च्या १३ व्या हंगामात ‘हे’ ५ मॅच विनर खेळाडू ठरले सुपर फ्लॉप; पहिला क्रमांक आश्चर्यकारक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---