दुबईच्या मैदानावर रविवारी (२५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ४४वा सामना झाला. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे १४६ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली.
२०० षटकार आणि ५०० चौकार मारणारा पहिला खेळाडू
२००८पासून सातत्याने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या विराटने आयपीएलमधील त्याचे २०० षटकार पूर्ण केले आहेत. त्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ४३ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने आयपीएलमध्ये २०० षटकारांचा आकडा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५वे स्थान पटकावले आहे.
एवढेच नव्हे, तर विराटने त्याचे आयपीएल कारकिर्दीतील ५०० चौकारही पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात ५०० चौकार आणि २०० षटकार जडणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे.
२०० षटकार मारणारे फलंदाज
विराटव्यतिरिक्त आयपीएलमध्ये २०० षटकारांचा आकडा गाठणाऱ्या फलंदाजांमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत १२९ सामने खेळले असून सर्वाधिक ३३६ षटकार लगावले आहेत, तर बेंगलोरचा एबी डिविलियर्स २३१ षटकारांसह या यादीत दूसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
तसेच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी (२१६ षटकार) आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (२०९ षटकार) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; माजी भारतीय क्रिकेटरने शेअर केला फोटो
पड्डीकलच्या फलंदाजीचा ‘हा’ धुंरधर अष्टपैलू झाला चाहता; म्हणतोय, ‘तो तर सेम मॅथ्यू हेडन’
धोनीच्या ‘त्या’ एका सल्लाने बेंगलोरच्या गोलंदाजाचे बदलले आयुष्य
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती