सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच टी२० सामन्यांची टी२० मालिका खेळविली जाईल. या मालिकेसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर, आज सूर्यकुमारने आपल्या निवडीचा आनंद खास पद्धतीने साजरा केला.
भारतीय संघात झाली सुर्यकुमारची निवड
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या सूर्यकुमारला गेले अनेक दिवस भारतीय संघात स्थान द्यावे अशी मागणी होत होती. आयपीएल २०२० मध्येही त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली होती. तरीही, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश नव्हता. त्यासाठी ट्वीटरवर मोहीम देखील चालवली गेली होती. मात्र, शुक्रवारी इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठीच्या १९ सदस्यीय भारतीय संघात त्याची निवड झाली.
असा साजरा केला आनंद
भारतीय संघात प्रथमच निवड झाल्याचा आनंद सूर्यकुमारने अनोख्या पद्धतीने साजरा केला. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आक्रमक अर्धशतक ठोकून त्याने हा आनंद व्यक्त केला. जयपूर येथील जयपुरिया महाविद्यालयाच्या मैदानावर दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३३ चेंडूंमध्ये ५० धावांची तुफानी खेळी केली. सलामीवीर पृथ्वी शॉने या सामन्यात शतक झळकावले. या सामन्यात मुंबईने ७ गडी राखून मोठा विजय मिळवला.
इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, कक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाची धमाकेदार फलंदाजी! ‘या’ स्पर्धेत ७ षटकारांसह केली शतकी खेळी
चौदा कोटी मिळवणाऱ्या रिचर्डसनची लिलावावेळी झाली होती ‘अशी’ अवस्था, स्वतः केला खुलासा
सीएसकेचे फलंदाज झोकात! दोन दिवसात तीन फलंदाजांनी झळकावले शतक