टी20 विश्वचषक 2024 च्या यशानंतर रोहित शर्माने टीम इंडियाची टी20 मधून साथ सोडली. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यंदाची टी20 विश्वचषकाची ट्राॅफी उंचावली. त्यानंतर विराट कोहली रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर टी20 विश्वचषकात टीम इंडियाची उपकर्णधार म्हणून जबाबदारी हार्दिक पांड्यावर होती. दरम्यान हार्दिकने देखील स्पर्धेत शानदार कामगिरी केले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्मा नंतर टी20 मध्ये नियमित कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती होणार असे बोलले जात होते.
वास्तविक, गाैतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर आगमी श्रीलंकेदाैऱ्यासाठी हार्दिक पांड्याला डावलून सूर्यकुमार यादवला टी20 संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. वृत्त अहवालानुसार हार्दिक पांड्याच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेंजमेंटमुळे गाैतम गंभीर आणि निवड समिती कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादवला निवडले आहे. असे बोलले जात आहे.
खरतरं, टी20 कर्णधारपद मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवला मोठी किंमत मोजावी लागत आहे. टी20 मध्ये कर्णधारपद मिळाल्यानंतर वनडे संघातून त्याला वगळण्यात आले आहे. सूर्याला अनेकावेळा एकदिवसीय संघात स्थान दिले होते .पण तो फारशी उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरला नाही. म्हणून निवड सामितीने या पर्यायाचा विचार करत आहेत. दुसरे कारण असे की, सूर्यकुमार यादवला 2026 च्या विश्वचषकापर्यंत कर्णधापद देण्यात येणार आहे. ज्यामुळे तो फक्त टी20 फाॅरमटमध्ये लक्ष्य क्रेंदित करु शकेल. कारण टी20 मध्ये सूर्यकुमार यादव सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याचप्रमाणे आयसीसी टी20 क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात सूर्या धावा काढण्यासाठी झगडताना पहायला मिळायला. या फाॅरमॅट सूर्यकुमारने 37 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 25.76 च्या सरासरीने 4 अर्धशतकांच्या जोरावर 773 धावा केल्या आहेत. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी मध्ये भारतीय संघाला 6 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आश्या परिस्थितीत बीसीसीआयकडून सूर्यकुमार यादवला वनडे संघातून बाहेर करण्यात आले आहे. याचा अर्थ सरळ आहे की, निवड समितीने त्याला एकदिवसीय संघात स्थान दिऊ इच्छित नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियातील या 5 खेळाडूंवर झाला अन्याय! पात्रता असूनही, बीसीसीआयने फिरवली पाठ
ईशान किशनच्या करिअरला ब्रेक? भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता एकच मार्ग
गाैतम गंभीरची गुगली! या खेळाडूच्या निवडीने केले सर्वांना आश्चर्यचकित