आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला १५ सदस्यीय संघ बुधवारी (८ सप्टेंबर) जाहीर केला. ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक असे निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आले. या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतातील अनेक अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ज्यामध्ये फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल आणि शिखर धवन सारख्या खेळाडूंना संधी मिळाली नाही. तर या दरम्यान अनेक युवा आणि नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवचा देखील समावेश केला आहे.
यादवची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक भावुक पोस्ट देखील केली आहे. इंस्टाग्रामवर आपल्या भावना मांडत यादवने लिहिले की, “स्वप्न खरी होतात. मला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणार आहे, त्यामुळे मी खूप भावूक झालो आहे. तसेच मला सन्मानाची अनुभूती येत आहे. त्यामुळे माझे प्रशिक्षक आणि माझ्या परिवाराला त्यांनी माझ्यासाठी दिलेले बलिदान, निरंतर प्रेम आणि समर्थनासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून मिळालेल्या या शुभेच्छामुळे मी स्वतःला खूप धन्य समजत आहे आहे.”
https://www.instagram.com/p/CTmJ_AiItqd/
सूर्यकुमार यादव हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. गेल्या अनेक काळापासून यादवने त्याच्या खेळातील स्तर उंचावला आहे. आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने त्याने अनेकांना प्रभावित केले. याच वर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चर सारख्या वेगवान गोलंदाजाला ‘हूक शॉट’ मारून षटकार लगावला होता. तसेच यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केले. यादवने ४ टी-२० सामन्यांमध्ये १६९ च्या स्ट्राइक रेटसह १३९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याची सरासरी ४६.३३ इतकी होती. यात त्याने २ अर्धशतक देखील लगावले होते. तसेच आयपीएलमध्ये यादवने आतापर्यंत १०८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १२ अर्धशतकांसह २१९७ धावा केल्या आहेत.
दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यानमध्ये खेळविण्यात येणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २४ ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय संघ ब गटात आहे. ज्यामध्ये भारतासोबत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत, तर उर्वरित २ संघ पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–श्रेयस अय्यरला राखीव खेळांडूमध्ये ठेवून ईशान किशनला मुख्य संघात संधी देण्यामागे ‘हे’ आहे कारण
–शेवटचा कसोटी सामना होणार की नाही? गांगुली म्हणाला, ‘आम्हाला माहित नाही…”
–धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्यामागे ‘हे’ आहे मोठे कारण, गांगुलीकडून खुलासा