आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सूरू होणार आहे. ज्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) (18 जानेवारी) रोजी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. ज्यामध्ये अनेक स्टार खेळाडूंची निवड झाली नाही. त्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाचा देखील समावेश होता. दरम्यान चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने सूर्यकुमार यादवने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
34 वर्षीय सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मंगळवारी (21 जानेवारी) पत्रकार परिषदेत म्हणाला की, “मी वनडे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही. याचे मला दु:ख आहे. त्यामुळे मी चॅम्पियन्स ट्राॅफी संघात नाही. जर मी चांगली कामगिरी केली असती, तर माझा संघात समावेश झाला असता.”
सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी20 विश्वचषक 2026 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो म्हणाला की, “टी20 विश्वचषक अजून दूर आहे. आम्ही एकावेळी एकाच मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहोत. दरम्यान शमीला संघात परत पाहून खूप आनंद झाला आहे. त्याच्यासारखा अनुभवी गोलंदाज संघात असणे, केव्हाही चांगले आहे.”
काही दिवसांपूर्वी माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) म्हटले होते की, भारताला चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये सूर्यकुमार यादवची गरज भासेल. रैना म्हणाला होता की, “जर सूर्यकुमार यादव संघात असता तर तो एक्स फॅक्टर झाला असता. संघाला त्याची उणीव भासेल. आता जबाबदारी सध्या फाॅर्ममध्ये नसलेल्या पहिल्या 3 फलंदाजांवर असेल. सूर्यकुमार हा असा फलंदाज आहे, जो कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो.”
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जुलै 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला वनडेमध्ये खूप संधी देखील देण्यात आल्या. त्याने भारतासाठी 37 वनडे सामन्यात 25.76च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह केवळ 773 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 105.2 राहिला आहे. 78 टी20 सामन्यात त्याने 40.79च्या सरासरीसह 167.86च्या स्ट्राईक रेटने 2,570 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 4 शतकांसह 21 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 1 कसोटी सामना देखील खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 8 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या नव्या नियमांवर इंग्लंड कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “हे नियम चुकीचे…”
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक कोण? केएल राहुल की रिषभ पंत? पाहा आकडेवारी
भारत-इंग्लंड पहिल्या टी20 सामन्यादरम्यान कसे असणार हवामान?