बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा याने अखेरपर्यंत झुंज दिली. दुखापतीग्रस्त अवस्थेेतही तो संघासाठी मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरल्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी आदर खूप वाढला आहे. रोहित 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या अंगठ्याला दुखापत झालेली होती. त्याने 28 चेंडूत 51 धावा ठोकत विजयाच्या जवळ आणलेे, मात्र भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अशातच भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स संघातील रोहितचा सहकारी खेळाडू सूर्यकुमार यादव याने एक ट्वीट केले, जे आता सोशल मिडीयावर प्रचंड व्हयरल होत आहे.
बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दुसऱ्याच षटकात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) झेल घेताना दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्या खांद्यावर आली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 271 धावा केल्या. या आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीर झटपट बाद झाले. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने तो फलंदाजीसाठी येईल की नाही ही शंका देखील होती. मात्र, 7 गडी बाद झाल्यानंतर रोहित मैदानात फलंदाजीसाठी मैदानात आला. मैदानात येताच त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना धुतले. त्याने 28 चेंडू 51 धावा केेल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीसाठी त्याचा सहकारी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने ट्वीट करत त्याच्या या खेळीबदद्ल आदर व्यक्त केला. या ट्वीटमध्ये त्याने म्हटलय की “खूप खूप आदर रोहित भावा”.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघ विजयाच्या लक्ष्य घेऊन मैैदानात उतरला. मात्र, दुसऱ्या सामन्यातही भारताच्या पदरी निराशाच पडली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय संघाने आता मालिकाही गमावली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ आता 0-2ने मागे आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून क्लिन स्वीप टाळण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजाची पत्नी विजयाच्या अगदी जवळ, म्हणाली, ‘गुजरातची जनता…’
‘ही खेळपट्टी कसोटीच्या लायकीची नाही’, इंग्लंडकडून पराभूत होताच रिझवानची पिचवर आगपाखड