भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) विश्वचषकातील 21वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे.
Suryakumar Yadav left the training session in pain after being hit on the wrist. (Vipul Kashyap). pic.twitter.com/vB0WztYsJA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023
आपला सलग पाचवा विजय मिळवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तत्पूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार व प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. असे असताना त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता सूर्यकुमार हा देखील दुखापतग्रस्त झाल्याचे दिसते.
धरमशाला येथे शनिवारी झालेल्या सायंकाळच्या सराव सत्रात सूर्यकुमार यादव फलंदाजी करत असताना थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघू याचा एक चेंडू त्याच्या उजव्या मनगटावर लागला. त्यानंतर त्याने त्यावर पंधरा ते वीस मिनिट आईस पॅक लावला. मात्र, वेदना असह्य झाल्याने त्याने नेट्समधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दुखापतीविषयी अद्याप कोणतीही औपचारिक माहिती मिळाली नाही.
सूर्यकुमार या सामन्यात न खेळल्यास ईशान किशन याला संधी मिळू शकते.
(Suryakumar Yadav Injured His Right Wrist In Nets Ahead Match Against Newzealand)
महत्वाच्या बातम्या –
इतिहास घडला! आख्खा संघ 29 धावांवर All Out, एकाही फलंदाजाने केली नाही 10 Run करण्याची डेरिंग
खर्याला मरण नाही! विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या सॅमसनची बॅट पुन्हा चमकली