भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना गेल्या शनिवारी (27 जुलै) खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 43 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. या स्फोटक फलंदाजीने सूर्याने इतिहास रचला आणि दिग्गज विराट कोहलीला मागे टाकले. किंग कोहलीला पराभूत करून सूर्या टी-20 इंटरनॅशनलचा नवा ‘डॉन’ बनला.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्याने 26 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली होती. या शानदार खेळीसाठी सूर्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. आंतरराष्ट्रीय टी20 मधील त्याचे हे 16 वे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ विजेतेपद आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 16 ‘प्लेअर ऑफ द मॅच’चे विजेतेपदही जिंकले. 16-16 जेतेपदांच्या बाबतीत सूर्याने किंग कोहलीची बरोबरी केली असली तरी सामन्यांच्या बाबतीत सूर्याने कोहलीला मागे टाकले आहे.
विराट कोहलीने 125 सामन्यांमध्ये 16 ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकले आहेत, तर सूर्याने केवळ 69 सामन्यांमध्ये 16 ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ असलेले खेळाडू
16* – सूर्यकुमार यादव (69 सामने)
16 – विराट कोहली (125 सामने)
15 – सिकंदर रझा (91 सामने)
14- मोहम्मद नबी (129 सामने)
14 – रोहित शर्मा (159 सामने)
14 – वीरनदीप सिंग (78 सामने)
सामन्याबद्ल बोल्याचे झाल्यास टाॅस जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाने मर्यादित 20 षटकांत 213/7 धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार सूर्याने सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनीही मोलाचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सुरुवातीला बलाढ्य दिसला पण अखेरीस केवळ 170 धावांवरच संघ सर्वबाद झाला. शेवटी टीम इंडियाने हा सामना 43 धावांनी जिंकला.
हेही वाचा-
आज फायनलमध्ये धडकणार भारत आणि श्रीलंका! कुठे आणि कधी पाहायचा सामना?
Paris Olympic 2024: 24 कोटी लोक, फक्त 7 खेळाडू…’, लाइव्ह टीव्हीवर पाकिस्तानचा ‘अपमान’
पहिल्या टी20 मधील विजयानंतर कर्णधार सूर्याचा आनंद गगनात मावेना; चक्क! असं काही बोलला…