---Advertisement---

तब्बल ६५ दिवसांनंतर पत्नीची भेट होताच सूर्यकुमारने लंडनच्या रस्त्यावर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव श्रीलंकेत होता. या दौऱ्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावर्षी एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण केल्यानंतर सूर्यकुमार आता कसोटीमध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे आणि त्याला इंग्लंड दौऱ्यात ही संधी देखील मिळू शकते.

दरम्यान, सूर्यकुमार यादव इंग्लंडमध्ये पत्नी देविशा शेट्टीला भेटला. हे दोघे ६५ दिवसांनी भेटले आहेत. त्यानंतर दोघे लंडनच्या रस्त्यावर डान्स करताना देखील दिसले. सूर्यकुमारने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना सूर्यकुमार याने लिहिले की, “६५ दिवसांनंतर लंडनच्या रस्त्यावर देविशासोबत डान्स”.

लोकांना त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. काही चाहत्यांनी या जोडप्याच्या डान्सचे कौतुक देखील केले आहे.

https://www.instagram.com/p/CSyRE5KDzbb/

भारताने भारतीय वेगवान गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आणि कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लॉर्ड्सवर भारतीय संघाचा हा तिसरा कसोटी विजय होता.

बुमराह आणि शमीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नवव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. ज्याच्या आधारे भारताने सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडसमोर ६० षटकांत २७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंड संघाला ५२ व्या षटकात १२० धावांवर गुंडाळले.

भारताचा वेगवान चौकडी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अनुभवी इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला विजयाकडे नेले. या गोलंदाजांनी सामन्यादरम्यान सर्व २० विकेट्स आपसात वाटून घेतल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने ३२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. इशांत शर्माने १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या आणि मोहम्मद शमीने १३ धावा देत १ विकेट घेतली.

सूर्यकुमार यादवला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळालेली नाही. तो या दोन्ही सामन्यांवेळी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत होता. पण आता तो २५ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर लंडनमध्ये भारतीय चाहत्यांनी धरला ‘सात समंदर पार’ गाण्यावर ठेका

पंजाबने तब्बल २२ कोटी खर्च केलेले खेळाडू उर्वरित आयपीएल २०२१ मधून बाहेर, ‘हा’ नवखा खेळाडू संघात सामील

“दोन्ही देशांतील संबंध सुधारल्यास भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेल”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---