भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याला त्याच्या 360 डिग्री फलंदाजीसाठी ओळखले जाते. आशिया चषक 2022 मधील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातही त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. चौकार-षटकारांची आतिषबाजी करत त्याने झंझावाती अर्धशतक केले आणि संघाला 192 धावांपर्यंत मजल मारून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या या वादळी खेळीचा अगदी रनमशीन विराट कोहली हादेखील चाहता बनला.
आयपीएल 2020दरम्यान एका प्रसंगामुळे सूर्यकुमारशी विवाद झालेल्या विराटने भर मैदानात त्याला सलाम ठोकला. आता विराटच्या या कृतीवर सूर्यकुमारची प्रतिक्रिया आली आहे.
One of the best and memorable pictures of Virat Kohli and Suryakumar Yadav. pic.twitter.com/UVOieBNk4x
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 31, 2022
विराटचा सूर्यकुमारला मुजरा
भारतीय संघाकडून सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) चमकदार प्रदर्शन केले. विराट कोहलीला (Virat Kohli) साथ देत त्याने 26 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने त्याने ही वादळी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 261.54 इतका होता. त्यातही विसाव्या षटकात त्याची फलंदाजी पाहण्यासारखी होती. हाँगकाँगचा गोलंदाज हरून अर्शदच्या या षटकात सूर्यकुमारने 4 षटकारांच्या मदतीने 26 धावा जमवल्या. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याने षटकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढत 26 धावा जमवल्या.
नॉन स्ट्राईकरवरून विराट सूर्यकुमारची फलंदाजी लाईव्ह पाहात होता. त्याच्या बॅटमधून एकमागोमाग एक निघत असलेल्या शॉटला पाहून विराट मंत्रमुग्ध झाला. त्याने भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर सूर्यकुमारला खाली वाकून नमस्कार (Virat Kohli Bows To Suryakumar Yadav) केला.
https://twitter.com/Brahman_Kuldip/status/1565016152237289472?s=20&t=DuRi_2OEKdAQQ2lcywqNPg
Virat Kohli's reaction for SuryaKumar Yadav and his innings. pic.twitter.com/zCV3YmNPOE
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 31, 2022
काय म्हणाला सूर्यकुमार यादव
विराटच्या या कृतीबद्दल सामन्यानंतर सूर्यकुमार बोलला आहे. तो म्हणाला की, “विराटने मला सलाम करणे, हा फारच हृदयस्पर्धी क्षण होता. मी असे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. सामना संपल्यानंतर मी विराटला बघत होतो आणि विचार करत होतो की, तो पुढे निघून गेला नाहीये का. पण मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला सोबत मैदानाबाहेर जाऊ असे म्हणालो. तो खूपच अनुभवी खेळाडू आहे. मला त्याच्यासोबत फलंदाजी करायला मजा येते. हेच मी विराटलाही सांगितले.”
सूर्यकुमारला फलंदाजीला आल्यानंतरच्या परिस्थितीबद्दलही बोलला. तो म्हणाला की, “परिस्थिती अशी होती की, मला वेगानेच धावा बनवायच्या होत्या. कारण सुरुवातीला खेळपट्टी थोडी संथ होती. मी विराटशी बोललो आणि तो मला म्हणाला की, तू तुझा नैसर्गिक खेळ दाखव. माझीही फलंदाजीबद्दलची योजना एकदम स्पष्ट होती. विराटसोबत फलंदाजी करायला खरोखरच खूप मजा आली.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार