---Advertisement---

ईशान की सूर्या? पाकिस्तान संघाविरुद्ध कर्णधार कोहली कोणाला देणार संधी?

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 3:10 PM
suryakumar
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर दुसरीकडे २३ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या सुपर १२ फेरीतील सामन्यांसाठी सर्व संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत. भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठल्या खेळाडूला संधी द्यावी हा मोठा प्रश्न विराट कोहली समोर उपस्थित झाला असेल.

आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने इंग्लंड आणि श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. ज्यामुळे त्याची आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात देखील तो फ्लॉप ठरला. ज्यामुळे त्याच्या ऐवजी ईशान किशनला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सूर्यकुमार यादवने गेल्या काही महिन्यात अप्रतिम फलंदाजी केली आहे. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तो यूएईच्या संथ खेळपट्टीवर फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे याच खेळपट्टीवर ईशान किशन तुफान फटकेबाजी करताना दिसला. ईशान किशनने सलग ३ अर्धशतक झळकावत विराट कोहलीच्या चिंतेत वाढ केली आहे . तर इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादवकडे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी असू शकते.

पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोणाला मिळणार संधी?

सूर्यकुमार यादवची आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकांवर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली होती. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातील निराशाजनक कामगिरी पाहता, त्याच्या  फलंदाजी क्रमांकात बदल होऊ शकतो. ईशान किशनने गेल्या काही महिन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात देखील ईशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले होते. ज्यामुळे पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन, ईशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकतो. असे केल्यास ईशान किशनला मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळेल.

अशी असू शकते पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या  सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन- :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ईशान किशन, रिपंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---