काही दिवसांपूर्वी संपलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या हंगामात २८ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना झाला होता. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली होती. त्याबद्दल क्रिकेट विश्वात बरीच चर्चाही रंगली होती. पण आता याबद्दल सुर्यकुमारनेच मौन सोडले असून त्याने त्या सामन्यानंतर विराटशी झालेल्या संवादाबद्दल खुलासा केला आहे.
त्या सामन्यात सुर्यकुमारने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या होत्या. एकावेळी मुंबई ७२ धावांवर ३ बाद अशा अवस्थेत असताना त्याने शेवटपर्यंत टिकून मुंबईला विजय मिळवून दिला होता. याबद्दल सामना संपल्यानंतर विराटने त्याचे कौतुक केले असल्याचे आता सुर्यकुमारने सांगितले आहे.
स्पोर्ट्स तकशी बोलताना सुर्यकुमार म्हणाला की “सामना संपल्यानंतर, सर्वकाही सुरळीत झाले होते. कारण तो(विराट) माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘चांगला खेळलास. मस्त खेळी होती आणि बाकी अन्य गोष्टी’. सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरळीत झाले होते, जसे तुम्ही तुमच्या मित्राला भेटता आणि सराव करता. मी ६०-६५ मिनीटे फलंदाजी करत असताना दबावात होतो, पण मी माझ्या खेळीची मजा घेतली.’
मुंबई-बेंगलोर सामन्यात नक्की काय झाले होते –
१३ व्या षटकात ४० धावांवर सुर्यकुमार फलंदाजी करत असताना विराट आणि त्याच्यामध्ये खुन्नस पहायला मिळाली होती. या षटकातील शेवटच्या चेंडूवर सुर्यकुमारने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने तो चेंडू लगेचच पकडला. त्यामुळे सुर्यकुमारला धाव घेता आली नाही. मात्र विराटने चेंडू पकडल्यानंतर तो सुर्यकुमारच्या दिशेने चालत येत असलेला दिसला.
यावेळी विराट सुर्यकुमारकडे भेदक नजरेने पाहात असल्याचेही दिसले. त्यावर सुर्यकुमारनेही विराटवरील नजर हाटवली नाही. त्यानेही त्याच्याकडे नजर रोखून ठेवली. यानंतर विराट सुर्यकुमारच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्यानंतर लगेचच सुर्यकुमार तिथून काहीही न बोलता निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
https://twitter.com/ROxSSR45/status/1321495694230740998
विराटच्या ट्विटवर कमेंट –
या घटनेनंतर काही दिवसांपूर्वीच विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मैदानावर फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने कमेंट केली होती की ‘ऊर्जा…आवाज…तू वरचढ ठरताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.” सूर्यकुमार यादवने केलेली ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
Energy 🔥 Sound 🔥 can’t wait to watch Domination 🔥#theBrand
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) November 17, 2020
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमारकडे दुर्लक्ष –
२६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सुर्यकुमारची निवड होईल, असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र त्याची एकाही भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे अनेक दिग्गजांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांनाही सुर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न केल्याने विराटवर निशाणा साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
-विराट कोहलीच्या व्हिडिओवर सुर्यकुमार यादवने केली कमेंट; चाहत्यांनी केला हल्लाबोल
-मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा
-…म्हणून सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली नाही निवड, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा खुलासा