सूर्यकुमार यादव हा मागील दोन वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सातत्याने धावा करताना दिसतो. तसेच तो आगामी काळात कसोटी संघात देखील पदार्पण करण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यांने नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले. ज्यावेळी आपल्याला कोणतीही शंका असते त्यावेळी आपण रोहित शर्मा याला कॉल करतो असे त्याने म्हटले.
सूर्याने या मुलाखतीत भारतीय संघातील अनेक गोष्टी सांगितल्या. मैदानावर नेहमी शांत दिसणारा सूर्या कधी गोंधळात पडतो का असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला,
“मला जेव्हाही कधी कोणता प्रश्न पडतो अथवा शंका उपस्थित होते, तेव्हा मी बिनदिक्कतपणे रोहित शर्मा याला कॉल करतो. त्या गोष्टीवर त्याची प्रतिक्रिया काय आहे हे मला नेहमीच जाणून घ्यायचे असते.”
सूर्या व रोहित देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतात. मागील जवळपास पंधरा वर्षांपासून ते संघसहकारी आहेत. भारतीय संघव्यतिरिक्त ते आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळताना दिसतात. यापूर्वी देखील सूर्याने अनेकदा मान्य केले आहे की, त्याच्या कारकिर्दी दरम्यान रोहितने त्याला मदत केली आहे.
टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या सूर्याची नजर आता कसोटी क्रिकेटवर आहे. भारताच्या कसोटी संघात प्रवेश मिळवण्यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये स्वत:ला परखण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा हा मधल्या फळीतील खेळाडू हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला. या सामन्यात आक्रमक अर्धशतक लगावत हंगामाची चांगली सुरुवात केली.
(Suryakumar Yadav said I call Rohit Sharma whenever I am in doubt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण
बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन