---Advertisement---

VIDEO | भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सूर्यकुमार भाऊंचा दरारा, विराटने केला टोपण नावाचा खुलासा

On: बुधवार, ऑक्टोबर 12, 2022 8:52 PM
virat kohli suryakumar yadav
---Advertisement---

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. विश्वचषकात भारताला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. तत्पूर्वी भारतीय संघ काही दिवासंपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे आणि वश्वचषकासाठी सराव देखील सुरू केला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याने जिममधील एक खास व्हिडिओ शेअर करत सूर्यकुमार यादव याच्या नोपणनावाचा खुलासा केला आहे. 

विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सूर्यकुमार यादव याला हा व्हिडिओ शूट करण्यासाठी श्रेय दिले आहे. विराट कोहली (Virat Kohli) व्हिडिओत वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू मैदानात क्रिकेटचा कसून सराव करत आहेत. सोबतच जिममध्येही घाम गाळत असल्याचे या व्हिडिओतून समजते. हा व्हिडिओ शेअर करताना विराटने एका खास गोष्टीचा खुलासा केला. विराटने सांगितले की, हा व्हिडिओ सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने शूट केला आहे. यावेळी त्याने सूर्यकुमारचा ‘भाऊ’ असाही उल्लेख केला.

दरम्यान, भाऊ हा शब्द प्रामुख्याने महाराष्ट्रात वापरला जातो. सूर्यकुमार देखील मुळचा मुंबईचा असल्यामुळे त्याला या नावाने संघात ओळखले जात असल्याचा अंदाजा चाहेत व्यक्त करू लागले आहेत. सूर्यकुमार यापूर्वी अनेकदा मराठीत बोलतानाही पाहिले गेले आहे. सूर्यकुमार मराठीत बोलतानाचे काही व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहीलने मागच्या महितन्यात खेळल्या गेलेल्या आशिया चषक स्पर्धेतून संघात पुनरागमन केले. त्याने सुमारे दोन महिन्यांपेक्षा मोठ्या काळानंतर भारतीय संघासाठी सामना खेळला होता. आशिया चषकात चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतिक्षाही संपली. त्याने जवळपास तीन वर्षांनंतर शतक ठोकले असून तो सध्या चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. दुसरीकडे सूर्यकुमार देखील दुखापतीतून सावरल्यानंतर उत्कृष्ट स्ट्राईक रेटने धावा करत आहे. आगामी टी-20 विश्वचषकात या दोघांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
झंझावाती शतकासह ‘या’ खेळाडूने ठोकली टीम इंडियात कमबॅकची दावेदारी; आयपीएलमध्येही मारलेल मैदान
एकच मारला, पण जबरदस्त मारला! सर्वत्र रंगलीय बटलरच्या विचित्र शॉटची चर्चा, व्हिडिओ पाहिला का?  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---