शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ३२वा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने आले होते. दरम्यान कोलकाताच्या डावातील तिसऱ्या षटकातच सूर्यकुमार यादवने शानदार झेल पडकत कोलकाताला पहिला धक्का दिला.
नाणेफेक निवडून कोलकाताचे सलामीवीर फलंदाज राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानावर आले होते. पण मुंबईच्या गोलंदाजांपुढे २९ वर्षीय त्रिपाठी जास्त वेळ टिकू शकला नाही. कसेबसे पहिल्या २ षटकात ५ धावा घेतल्यानंतर त्याने ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार लगावला.
त्यानंतर पुढील चेंडूलाही सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या दृष्टीने त्याने मैदानाच्या डाव्या बाजूला शॉट मारला. पण तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या सूर्यकुमारने हवेत शानदार उडी घेत तो वेगाने जाणारा चेंडू दोन्ही हातांनी पकडला. त्यामुळे त्रिपाठी ९ चेंडूत ७ धावा करत मैदानाबाहेर गेला.
https://twitter.com/153_Centurion/status/1317109745321308161?s=20
Trent Boult's reaction says it all. That stunner of a catch by @surya_14kumar.#Dream11IPL pic.twitter.com/8zb7XFUxvZ
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
Whoa! 😮
A sure contender for the ‘catch of the tournament’… and going by those reactions, could be a winner👌#Dream11IPL #CricketYourWay #MIvKKR #IPL2020 pic.twitter.com/p9J51tJe5r— Hotstar USA (@Hotstarusa) October 16, 2020
सूर्यकुमारच्या या अप्रतिम झेलला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी तर त्या झेलला सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेल, असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पैज लावून सांगतो, क्रिकेटचा असा व्हिडीओ तुम्ही यापुर्वी पाहिला नसेल
कार्तिकप्रमाणेच आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद; पाँटिंग, गंभीरचाही समावेश
याला म्हणतात अंदाज! कार्तिकच्या पायउतार होण्याची भविष्यवाणी झाली होती १२ दिवस आधीच
ट्रेंडिंग लख-
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण