Suryakumar Yadav T20I Captaincy: रोहित शर्माच्या टी20 क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयामुळे त्याचा दावेदार कोण असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुरुवातीला उपकर्णधार हार्दिक पांड्या रोहितची जागा घेईल असे वाटत होते. परंतु भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदाचा दावेदार म्हटल्याचे समजत आहे. तसेच सूर्यकुमार निवड समितीचीही पहिली पसंती असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सूर्यकुमार टी20 संघाचा भावी कर्णधार बनण्याची दाट शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, आज या लेखाद्वारे आपण सूर्यकुमार यादवला भारताच्या टी20 संघाचा कर्णधार का बनवले जावे? यामागची 3 कारणे जाणून घेणार आहोत.
1. आक्रमक फलंदाजी
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव हा एक स्फोटक फलंदाज आहे, ज्याची सरासरी 43 पेक्षा जास्त आहे आणि स्ट्राइक रेट 167 पेक्षा जास्त आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 167 च्या स्ट्राइक रेटने एकूण चार शतके आणि 19 अर्धशतकेही केली आहेत. त्याची आक्रमक फलंदाजी दबावाच्या परिस्थितीत खूप उपयुक्त ठरते.
2. कमी अनुभव असूनही, सूर्याचा टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रेकॉर्ड चांगला
त्याच वेळी, भारताचा कर्णधार असताना सूर्यकुमारने 7 टी20 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, जर आपण हार्दिक पांड्याबद्दल बोललो तर त्याने 100 टी20 सामन्यांमध्ये एकूण 1492 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 26.64 होती. यादरम्यान त्याने चार अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने टी20 क्रिकेटमध्ये एकूण 84 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय हार्दिकने 16 टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 10 सामने तो जिंकला आहे.
3. प्रशिक्षकाचे समर्थन
भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून हवा आहे. यासंदर्भात माध्यमांमध्ये अनेक अहवाल समोर आले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी असताना गंभीरच्या नेतृत्त्वाखाली सूर्यकुमार यादव याच संघाकडून खेळला होता. त्यामुळे गंभीरला सूर्यकुमारमधील प्रतिभेची चांगली जाण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधारपद तर फक्त ट्रेलर, पाहा पुढे आणखी काय काय होणार.., गौतम गंभीरने 2023 मध्येच दिलेला इशारा
रोहितला ऐकावा लागला प्रशिक्षक गंभीरचा आदेश! वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?