सूर्यकुमार यादव टी20 चा उत्कृष्ट खेळाडू आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सरासरीचीच राहिली आहे.
श्रीलंका दौऱ्यापूर्वी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सूर्याला ‘टी20 स्पेशलिस्ट’ म्हटलं होतं. त्याचा सध्या इतर फॉरमॅटसाठी विचार केला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. असं असून देखील सूर्यानं कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तो यासाठी तयारीला लागला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवनं 2024-25 रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. गतविजेता मुंबईचा संघ स्पर्धेच्या ‘अ’ गटात असून त्यांचा पहिला सामना बडोदा विरुद्ध होणार आहे. यानंतर संघाचा दुसरा सामना 18 ऑक्टोबरपासून महाराष्ट्राविरुद्ध आहे. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव उपलब्ध असणार आहे. आता तो या सामन्यात मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
सूर्यकुमार यादव सध्या बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. टीम इंडियानं मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, भारतीय संघाला 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमारची भारतीय संघात निवड होणार नाही. त्यामुळे या वेळेत त्यानं रणजी स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा –
मोठी बातमी! बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो ‘हिटमॅन’; कारण जाणून घ्या
ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप, दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा दणदणीत विजय!
भारताच्या मोठ्या विजयानं बदललं संपूर्ण चित्र, आता सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या