---Advertisement---

‘माझं तोंड बघून तुला कळत नाही का?’, वाचा रोहितच्या ‘त्या’ प्रश्नावर असं का म्हणालेला सूर्यकुमार

On: बुधवार, एप्रिल 20, 2022 8:48 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाचा मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज आहे. त्याचे संघातील स्थान आता पक्के झाले आहे. परंतु अशीही एक वेळ होती, जेव्हा तो भारतीय संघात संधी मिळण्यासाठी प्रयत्न करत होता. आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करून देखील त्याला अनेकदा संघीत संधी मिळाली नव्हती. याच पार्श्वभूमीवर सूर्यकुमार त्यावेळी खूप नाराज झाला होता. आता त्याने या संघर्षाच्या काळातील एका प्रसंगाचा खुलासा केला आहे.

गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रोहित शर्मासोबत झालेल्या चर्चाचा खुसाला केला. मुंबई इंडियन्ससोबत सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते, पण आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी त्याला खूप वाट पाहावी लागली. याविषयी आता तो व्यक्त झाला आहे.

सूर्यकुमार म्हणाला की, “माझ्यासाठी आयपीएलची सुरुवात ज्या पद्धतीने झाली, ती खूप जबरदस्त होती. असे असले, तरी त्यानंतर दोन-तीन संघांची घोषणा झाली, पण माझे नाव त्यात नव्हते. प्रत्येकजण म्हणत होता की, माझे सिलेक्शन होईल, पण असे झाले नाही. मी हाच विचार करत होतो की, अखेर असं कसं काय झाले?”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संघात निवड न झाल्यानंतर रोहित शर्मासोबत झालेल्या चर्चाचा खुसाला करताना तो म्हणाला की, “माझ्यासाठी मागच्या दोन वर्षांपासून सर्वकाही ठीक चालले होते. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्ही विचार करू लागता, आता तुम्हाला काय करण्याची गरज आहे. रोहित शर्माने मला विचारले की, तू निराश आहे का? मी यावर म्हणालो की, माझा चेहरा पाहून कळत नाहीये का? मला वाटले की, तुला माझा चेहरा पाहून कळले असेल.”

सूर्यकुमारच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमितपणे चांगला खेळत आला आहे. आयपीएल २०२०मधील प्रदर्शनानंतर अखेर त्याला भारतासाठी पदार्पणाची संधी मिळाली होती. चालू आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे, पण सूर्यकुमारचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र चांगले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आरसीबीसाठी ‘छुपा रुस्तम’ ठरतोय ‘हा’ वेगवान गोलंदाज, जबरदस्त प्रदर्शन करत गाजवतोय आयपीएल

बिग ब्रेकिंग! दिल्लीचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आज होणाऱ्या दिल्ली-पंजाब सामन्यावर प्रश्नचिन्ह

विराटचा उत्साह शिगेला! केएल राहुल आऊट होताच दिली अशी रिऍक्शन, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---