---Advertisement---

‘मुंबईकर’ सूर्यकुमार यादव करणार वनडे पदार्पण! स्वतः कर्णधाराने केली पुष्टी

---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानची वनडे मालिका रविवारपासून (१८ जुलै) सुरू होत आहे. भारतीय संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत ज्यांना या मालिकेत प्रथमच वनडे क्रिकेट खेळताना पाहिले जाऊ शकते. या खेळाडूंपैकी एक फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. त्याने भारताकडून टी२० मध्ये पदार्पण केले असले तरी, अद्याप वनडे क्रिकेटमध्ये तो पदार्पण करू शकला नाही. मात्र, रविवारी त्याची प्रतिक्षा संपणार आहे. कारण सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होणार आहे, याची कर्णधार शिखर धवनने पुष्टी केली.

सूर्यकुमार एक दर्जेदार खेळाडू
पहिल्या वनडेआधी झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत शिखर धवन म्हणाला, “सूर्यकुमार यादव वनडे मालिकेत खेळताना दिसेल. आम्ही संघ निश्चित केला आहे आणि रविवारी त्याचा खुलासा होईल. सूर्यकुमार एक दर्जेदार खेळाडू असून, त्याने घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातही त्याने स्वत: ला सिद्ध केले. मला खात्री आहे की, तो या मालिकेतही चांगली कामगिरी करेल. कारण तो फॉर्ममध्ये दिसत आहे.”

युवा खेळाडूंचे केले कौतुक
शिखर धवन याने संघातील युवा खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला, “या खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. आमच्यासाठी ही वनडे मालिका महत्त्वपूर्ण आहे. आमचा संघ खूप तरुण असून, प्रत्येक खेळाडूला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी‌. जेणेकरुन ते त्यांची प्रतिभा दर्शवू शकतील.”

अशी आहे सूर्यकुमारची कारकीर्द
सूर्यकुमार यादव याने लिस्ट ए कारकिर्दीत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने ९८ सामन्यात ३७.५५ च्या सरासरीने २७७९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ३ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली असून, यादरम्यान सूर्यकुमारचा स्ट्राइक रेटही १०० च्या वर आहे. सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने २ डावांमध्ये ८९ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आपल्या पहिल्या वनडे मालिकेत काय करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘असल्या कुठल्याही प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करत नाही’, टीम इंडियातील ‘त्या’ गोष्टीवर गांगुलीची प्रतिक्रिया

तब्बल ७ फूट ४ इंच उंची लाभलेली चौदा वर्षाची बास्केटबॉलपटू, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारत आणि श्रीलंकेतील आजवरचा सर्वात रोमांचक वनडे; झाल्या होत्या ८०० पेक्षा अधिक धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---