राजकोटमध्ये सध्या सौराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2022) स्पर्धेतील सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज सरफराज खान याने पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता दाखवून दिली. त्याने या सामन्यात त्याच्या बॅटची धमक दाखवून दिली आणि पुन्हा एकदा जबरदस्त शतक ठोकले. सरफराजची ही खेळी पाहून भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादव देखील चांगलाच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले.
सौराष्ट्र संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वातील सौराष्ट्र संघ पहिल्या डावात अवघ्या 98 धावा करून सर्वबाद झाला. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चार चेंडूत एक धाव करून बाद झाला. रेस्ट ऑफ इंडियासाठी मुकेश कुमारने चार विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिक आणि कुलदीप यादव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या रेस्ट ऑफ इंडियासाठी कर्णधार हनुमा विहारी आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
हनुमा विहारीने या सामन्यात 82 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच सरफराज खान यांनी 178 चेंडूत 138 धावा कुटल्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दिलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखील सरफराजने असेच जबरदस्त प्रदर्शन करून शतक केले होते. त्याने रेस्ट ऑफ इंडियासाठी केलेल्या या शतकीय खेळीनंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर चांगलाच प्रभाव पडल्याचे दिसत आहे. सरफराजच्या कौतुक करण्यासाठी सूर्यकुमारने एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीत मागे टीव्ही स्क्रीन दिसत आहे, ज्यावर सरफराज खानला आपण पाहू शकतो.
https://twitter.com/surya_14kumar/status/1576158777291988992?s=20&t=u3ExXYiG-Mj0B4qScrxRtw
दरम्यान, सरफराजने रणजी ट्रॉफीच्या मागच्या दोन हंगामांमध्ये अशाच प्रकारे खेळी केली आहे. या हंगामात त्याने 12.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. त्याआधी 2019-20 रणजी हंगामात त्याने सहा सामने खेळले होते आणि यामध्ये 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. एवढी चांगली आकडेवारी असली, तरी सरफराजला आद्याप भारतीय संघाकडून खेळण्याची एकही संधी मिळाली नाहीये. क्रिकेटचे अनेक जाणकार आणि चाहते त्याला भारतासाठी पदार्पण करताना पाहू इच्छितात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषक 2022: दिग्गज क्रिकेटपटूने शमी-सिराजच्या तयारीची उडवली खिल्ली
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता