---Advertisement---

मी आहे ना! विजयानंतर सूर्यकुमार यादवने संघातील खेळाडूंकडे पाहून केला इशारा, पाहा व्हिडीओ

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 10:06 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना 5 विकेट्सने सहजपणे जिंकला. या विजयानंतर सूर्यकुमार मैदानाबाहेर बसलेल्या संघातील इतर खेळाडूंकडे पाहून इशाऱ्याने काहीतरी बोलताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

संघातील खेळाडूंकडे पाहून केला इशारा
या सामन्यात सूर्यकुमारने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर तो सामन्याच्या अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याच्या या खेळीमुळेच मुंबईला या सामन्यात 2 महत्वाचे गुण मिळवता आले. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने संघातील मैदानाबाहेर बसलेल्या इतर खेळाडूंकडे पाहून इशारा केला. यावेळी तो इशाऱ्याने जणू, ‘मी आहे ना..’ असे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता.

मुंबईच्या इतर फलंदाजांना आले अपयश 

मुंबईकडून यादव वगळता कोणताही फलंदाज जास्त काळ टिकू शकला नाही.विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याने 15 चेंडूत 17 धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डिकॉक (19) आणि ईशान किशन (25) यांनी डावाची चांगली सुरुवात केली. मात्र, ते चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीत रूपांतर करू शकले नाहीत.

देवदत्त पडीक्कलने केली उत्कृष्ट फलंदाजी  

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघाकडून सलामीवीर देवदत्त पडीक्कलने 45 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या. त्याने सलामीवीर जोश फिलिप (33) सह पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. यानंतर आरसीबीच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अधिक काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे या संघाला 20 षटकांत केवळ 164 धावा करता आल्या.

मुंबईच्या गोलंदाजांनी केली उत्तम कामगिरी 

मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. वेगवान गोलंदाज बुमराहने चार षटकांत केवळ 14 धावा देऊन तीन गडी बाद केले. मुंबईचा कर्णधार कायरान पोलार्डने या सामन्यात आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्सची महत्वपूर्ण विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट

विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ

सुर्यकुमारला केलेलं ट्विट माझ्यासाठीही केलं असतं तर माझंही करियर वाचलं असतं!

ट्रेंडिंग लेख-

-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर

-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---