मुंबई । भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली येथील भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांच्या वडिलांची एसयूव्ही कार चोरीला गेली आहे. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेची नोंद दिल्ली येथील राजेंद्रनगर पोलीस चौकीत करण्यात आली आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. डीसीपी म्हणाले, सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा शोध घेणार आहे.
गौतम गंभीर हे सध्या आपल्या वडिलांसोबत दिल्ली येथे राहतात. त्यांच्या वडिलांच्या गाडीची चोरी म्हणजे एका खासदाराच्या घरात जाऊन केलेली ही चोरी आहे. यावरून खासदाराचे घर देखील सुरक्षित नसल्याचे दिसून येते. या घटनेमुळे दिल्लीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
गौतम गंभीर भारताकडून ५८ कसोटी, १४७ वनडे व ३७ टी२० सामने खेळला असून सध्या तो भाजपकडून दिल्लीमधून लोकसभा खासदार आहे.