---Advertisement---

सलग ४ वनडे विश्वचषकात ४ शतके, न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा कोणत्या पुरुष क्रिकेटरलाही न जमलेला पराक्रम

Suzie-Bates
---Advertisement---

आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ मधील २६ वा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात झाला. न्यूझीलंडने सलामीवीर सुझी बेट्स हिच्या शतकी खेळीच्या जोरावर ७१ धावांनी हा सामना जिंकला. शतकी खेळीसह सुझीने तिच्या खात्यात भीमपराक्रमाची नोंद केली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुझीने (Suzie Bates) न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या. तब्बल १३५ चेंडूंचा सामना करताना तिने १४ चौकारांच्या मदतीने १२६ धावा केल्या. ही तिची विश्वचषकातील चौथी शतकी खेळी होती. या शानदार शतकी खेळीसह ती सलग ४ वनडे विश्वचषकात शतक करणारी जगातील पहिलाच क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) ठरली (Consecutive 4 Centuries In ODI World Cup) आहे. 

सुझीने वनडे विश्वचषक २०२२ पूर्वी मागील हंगामात अर्थात २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १०६ धावा फटकावल्या होत्या. त्यापूर्वीच्या २०१३ मधील विश्वचषकात तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकले होते. त्यावेळी तिने १०२ धावा केल्या होत्या. तसेच त्यापूर्वीच्या २००९ च्या वनडे विश्वचषकात सुझीने पाकिस्तानविरुद्ध १६८ धावांची खेळी केली होती. तसेच हे तिचे वनडे कारकिर्दीतील १२ वे शतकही होते.

तसेच या शतकासह सुझीने तिच्या वनडे क्रिकेटमधील ५००० धावाही पूर्ण केल्या (5000 ODI Runs) आहेत. यासह ती महिला वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारी जगातील चौथी खेळाडू ठरली आहे. तिच्या खात्यात १४२ वनडे सामने खेळताना ५०४५ धावा केल्या आहेत. यादरम्यान १२ शतकांव्यतिरिक्त तिने २८ अर्धशतकेही केली आहेत.

असा झाला सामना
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे (PAKW vs NZW) संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून अगोदरच बाहेर पडले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सुझीच्या १२६ धावांच्या खेळीसह ५० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत २६५ धावा केल्या होत्या. या डावात पाकिस्तानकडून निदा डार हिने ३ विकेट्स घेतल्या होत्या.

न्यूझीलंडच्या २६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून निदा डारने अर्धशतक केले होते. तसेच कर्णधार बिस्माह मरूफनेही ३८ धावांचे योगदान दिले होते. मात्र त्यांना ५० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १९४ धावाच करता आल्या. या डावात न्यूझीलंडकडून हनाह रोवने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या पराभवाने भारताला फायदा, कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत गाठला ‘हा’ क्रमांक

युवा खेळाडूंबाबत काय बोलून गेला दिल्लीचा कर्णधार रिषभ? म्हणे, ‘२ महिन्यात कोणाला सुपरहिरो नाही…’

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---