काल रॉजर फेडररने मारिन चिलीचवर विम्बल्डन अंतिम फेरीत विजय मिळवून १९वे ग्रँडस्लॅम जिंकले. या विजयाबरोबर त्याने विक्रमी ८व्या विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली.
रॉजर फेडररला टेनिस मधील सार्वकालीन महान टेनिसपटू म्हणून संबोधले जाते. या विक्रमवीराने काल बऱ्याच विश्वविक्रमांना गवसणी घातलीय. यातील असंख्य विक्रम हे पुढील काही काळात मोडणे केवळ अशक्य आहेत. अशाच काही विक्रमांचा हा लेखाजोखा…
#रॉजर फेडररची १९ ग्रँडस्लॅम विजेतेपद
विम्बल्डन: २००३, ०४, ०५, ०६, ०७, ०९, १२ आणि २०१७
अमेरिकन ओपन: २००४, ०५, ०६, ०७, २००८
ऑस्ट्रेलियन ओपन: २००४, ०६, ०७, १०, २०१७
फ्रेंच ओपन: २००९
रॉजर फेडरर पुरुष एकेरीत विम्बल्डनवर ८ विजेतेपद जिंकणारा एकमेव खेळाडू
रॉजर फेडरर(८): २००३, ०४, ०५, ०६, ०७, ०९, १२ आणि २०१७
विल्यम रेनशॉ(७): १८८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६ आणि १८८९
पिट सॅम्प्रास(७): १९९३, ९४, ९५, ९७, ९८, १९९९ आणि २०००
सर्वाधिक वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू
१९ रॉजर फेडरर
१५ राफेल नदाल
१४ पिट सम्प्रास
१२ नोवाक जोकोविच
एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदं
१० राफेल नदाल फ्रेंच ओपन
८ रॉजर फेडरर विम्बल्डन
७ पिट सम्प्रास विम्बल्डन
एकही सेट न गमावता ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू
बियाँ बोर्ग: १९७६ विम्बल्डन, १९७८ व १९८० फ्रेंच ओपन
रफाएल नदाल: २००८, २०१० व २०१७ फ्रेंच ओपन
रॉजर फेडरर: २००७ ऑस्ट्रेलियन, २०१७ विम्बल्डन
३५ वर्ष आणि ३४२दिवस वय असणारा रॉजर फेडरर व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाल्यानंतरचा सर्वात वयस्कर विम्बल्डन विजेता आहे.
फेडरर या विजेतेपदाबरोबर दुसरा वयस्कर ग्रँडस्लॅम विजेता बनला आहे. यापूर्वी ३७ वर्षीय केन रॉसेवेल यांनी १९७२ साली ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते.