---Advertisement---

ब्रेकिंग! सिडनी सिक्सर्सने पटकावले बिग बॅश लीगच्या दहाव्या पर्वाचे विजेतेपद, अंतिम सामन्यात पर्थ स्काॅचर्सचा २७ धावांनी पराभव

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 5:56 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगच्या (बीबीएल २०२१) दहाव्या पर्वाचा अंतिम सामना पर्थ स्कॉर्चर्स व सिडनी सिक्सर्स यांच्या दरम्यान सिडनी येथे खेळला गेला. सिक्सर्सने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत स्कॉर्चर्सला २७ धावांनी नमवत आपले तिसरे बीबीएल विजेतेपद पटकावले. मागील वर्षी देखील सिक्सर्सनेच चषक उंचावला होता.

फलंदाजांची दमदार कामगिरी

प्रथम फलंदाजी करत असलेल्या सिडनीने सलामीवीर जेम्स व्हिन्सच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर १८८ धावा धावफलकावर लावल्या. अष्टपैलू डॅन ख्रिस्टीयनने २० धावांचे योगदान दिले. स्कॉर्चर्सकडून ऍण्ड्रू टाय व जे रिचर्डसन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

स्कॉर्चर्सला नडला फलंदाजांचा आततायीपणा

सिक्सर्सने दिलेले १८९ धावांचे आव्हान स्कॉर्चर्ससाठी डोंगराएवढे झाले. सलामीवीर लियम लिव्हींगस्टोन वगळता अन्य फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. लिव्हींगस्टोनने ४५ धावांची खेळी केली. सिक्सर्सकडून अष्टपैलू बेन द्वारशीसने सर्वाधिक तीन तर जॅक्सन बर्ड व डॅन ख्रिस्टीयनने प्रत्येकी दोन बळी मिळवले. ९५ धावांच्या शानदार खेळीसाठी व्हिन्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

खो गए हम कहां! चेंडू उडाला एका दिशेला आणि पंत पळाला भलत्याच दिशेला, पाहा मजेशीर व्हिडिओ

मला अवॉर्ड मिळणार नाही का? विराटच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत असताना इंग्लिश गोलंदाजाची विनोदी प्रतिक्रिया

INDvsENG 1st Test: जो रुटच्या विक्रमी द्विशतकानंतर इंग्लंडचं शेपूटही वळवळलंच; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ८ बाद ५५५ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---