सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोदा संघ सहभागी झाला आहे. मात्र या संघाबद्दल बरीच चर्चा ऐकायला मिळत आहे. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा यांच्यात वाद झाला आहे. दीपक हुड्डाने कृणाल पंड्यावर आपल्या सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर दीपक हुड्डा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या सराव शिबिरातून बाहेर पडला आहे.
त्यामुळे बडोदा संघाने संघाच्या मॅनेजरकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या राष्ट्रीय टी-20 स्पर्धेची सुरुवात रविवारी झाली. बीसीएचे सचिव अजित लेले रविवारी सांगितले खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात राहत आहेत. त्यामुळे दीपक हुड्डाच्या जागी कोणत्याही खेळाडूला सहभागी केलेले नाही. त्यांनी सांगितले ते मॅनेजरच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.
बीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दीपक हुड्डा संघाच्या हॉटेल मधून बाहेर गेला आहे. दीपक हुड्डाने बडोदा संघासाठी 46 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याला 68 अ श्रेणीतील सामने आणि 123 टी-20 सामन्याचा अनुभव आहे. तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या कृणाल पंड्याने केलेल्या गैरवर्तनामुळे नाराज आहे. त्याने याबद्दल बीसीएला ईमेल पाठवला आहे. दीपक हुड्डाने पाठवलेल्या ईमेलची एक कॉपी बीसीसीआयकडे सुद्धा आहे. ज्यामध्ये लिहले आहे, “सध्या मी निराश आणि दबावात आहे. मागील काही दिवसांपासून माझ्या संघाचा कर्णधार कृणाल पंड्या माझ्या साथीदारांसमोर माझ्यासोबत अभद्र भाषेचा वापर करत आहे. तो या ठिकाणी रिलायन्स स्टेडियम बडोदा मध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या इतर संघाच्या खेळाडूंसमोर सुद्धा असेच करत आहे.”
दीपक हुड्डाने आरोप करताना म्हणले आहे की, “मुख्य प्रशिक्षक प्रभाकर यांच्या परवानगीने पहिल्या सामन्यासाठी जेव्हा मी नेट मध्ये सराव करत होतो, तेव्हा कृणाल पंड्या तिथे आला आणि त्याने माझ्या सोबत गैरवर्तन केले.” बडोदाचा संघ एलिट ग्रुप सी मध्ये गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड संघासोबत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: कृणाल पंड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोद्याची विजयी सुरुवात