---Advertisement---

धक्कादायक! आजारपणामुळे सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा मध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये पोहोचला ‘हा’ भारतीय खेळाडू

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 11:33 PM
---Advertisement---

कोरोना नंतर पहिल्यांदाच भारतात क्रिकेटला सुरुवात झाली असून 10 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील 38 संघ सहभागी होत असून, भारतातील काही अनुभवी व युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची ही एक मोठी संधी असते. आयपीएल मध्ये आपल्या कामगिरीची थोडीशी चुणूक दाखवणाऱ्या वरूण अॅरोनसाठी देखील ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात होती, मात्र आपल्या आजारपणामुळे स्पर्धा मध्येच सोडून अॅरोन हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरूण अॅरोन सध्या लेरिन्जाइटिस आजारामुळे पीडित असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये भरती झालेला आहे. डॉक्टरांचे त्यांच्यावर योग्य उपचार देखील सुरू असे आहेत. या आजारामुळे अॅरोन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. ”

झारखंड कडून खेळणाऱ्या अॅरोनने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील पहिला सामना खेळलेला होता. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती बिघल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये भरती झाला.अॅरोनने भारताकडून 9 कसोटी व 9 वनडे सामने खेळलेले आहेत. यात त्याने कसोटीत 18 तर वनडेत 11 विकेट्स घेतलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली तर शास्त्री गुरुजी पडणार तोंडघशी, कसं ते पाहाच!

SL vs ENG : इंग्लंडच्या दमदार गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजी ढेपाळली, पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाचे वर्चस्व

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---