---Advertisement---

अविश्वसनीय! ४१ वर्षीय गोलंदाजाने मुंबईविरुद्ध ५ विकेट्स घेत केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 11:38 AM
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सध्या युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसत आहेत मात्र. मुंबई आणि पाँडेचेरी संघात झालेल्या सामन्यात झालेल्या सामन्यात 41 वर्षीय गोलंदाजाने 5 विकेट्स दमदार गोलंदाजी केली. ते सुद्धा मुंबईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात. पाँडेचेरी संघातील 41 वर्षीय सांता मूर्ती या गोलंदाजांने भेदक गोलंदाजी करताना मुंबई संघाचे 5 गडी बाद केले. त्याचबरोबर तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

सांता मूर्तीने पावरप्ले गोलंदाजी करताना सूर्य कुमार यादव, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे सारख्या खेळाडूंना तंबूत धाडले. या तीन ही खेळाडूंचा झेल यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सन याने घेतले. त्यानंतर सांता मूर्तीने पावरप्लेच्या समाप्तीनंतर यशस्वी जयस्वाल आणि सुजित नाईक यांना बाद केले. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 20 धावा देत 5 गडी बाद केले. त्यामुळे मुंबईचा संघ 94 धावांत गारद झाला.

पाँडेचेरी संघाचा कर्णधार दामोदरन रोहित याने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सांता मूर्तीच्या हाती चेंडू दिला होता. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ करताना सांता मूर्तीने आपली पहिली शिकार आदित्य तरेच्या रूपाने केले. त्याचबरोबर त्याने मुंबई संघाचे अजून दोन गडी बाद केले. अशा प्रकारे त्याने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले.पावरप्ले च्या समाप्तीनंतर त्यांनी आणखी दोन गडी बाद करत. मुंबई संघाला उद्वस्त केले.

मुंबई संघाने आपले 5 खेळाडू फक्त 39 धावांवर गमावले. आपल्या शेवटच्या षटकात सुजित नाईकला बाद करताना सांता मूर्तीने आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणारा सांता मूर्ती सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. उजव्या हाताच्या गोलंदाजाचे वय 41 वर्षे 129 दिवस आहे. सांता मूर्तीने 2006 साली केनुट टुलोच या गोलंदाजाने केलेला विक्रम मोडला. केनुट टुलोच या गोलंदाजाने 2006 सेंट लूसिया संघाविरुद्ध 41 वर्षे 7 दिवस वय असताना 21 धावा देवून 5 विकेट घेतल्या होत्या.

सांता मूर्तीचा जन्म 10 सप्टेंबर 1979 मध्ये झाला होता. त्याने आपला पहिला सामना 10 ऑक्टोबर 2019 साली पाँडेचेरी संघासाठी खेळला होता. 2019 मध्ये त्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना खेळला होता. त्याचबरोबर त्याने फेब्रुवारी 2019 मध्ये आपला पहिला रणजी सामना खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

वेलकम बॅक शाकिब..! ‘या’ मालिकेतून १४ महिन्यांनंतर करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

भारतीय संघाला कमी लेखणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा ‘यू-टर्न’; आता करतोय तोंडभरुन कौतुक

ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ आकडा आहे अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---