कोरोना काळानंतर पहिल्यांदाच भारतात क्रिकेटला सुरुवात होत असून, आज दिनांक 10 जानेवारीपासून भारतात सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. या महत्वाच्या टूर्नामेंट मध्ये सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष भारतातील स्टार खेळाडूंवर होते. काही खेळाडूंनी आपल्या कौशल्याने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली तर काही पूर्णतः अपयशी ठरले आहेत.
तब्बल दोन वर्षांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या सुरेश रैना कडून सर्व क्रिकेटप्रेमींना उत्तम कामगिरीची अपेक्षा होती. सुरेश रैनाने अर्धशतक देखील झळकावले मात्र त्याच्या संथ खेळीमुळे उत्तर प्रदेश संघाचा पराभव झाला आहे.
बंगळुरूत सुरू झालेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाब दरम्यानच्या सामन्यात पंजाब ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमावत केवळ 134 धावा केल्या.इतक्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेश संघ सहज विजय मिळवेल अशी शक्यता होती. मात्र उत्तर प्रदेश संघ 20 षटकात 5 गडी गमावत केवळ 123 धावाच करू शकला.
उत्तर प्रदेश संघाकडून सुरेश रैनाने अतिशय संथ खेळी करत 50 चेंडू खेळून केवळ 56 धावा बनवल्या. रैनाची ही खेळी संघासाठी फारशी उपयोगी ठरली नाही व उत्तर प्रदेश संघाचा 11 धावांनी पराभव झाला.
उत्तर प्रदेशचा पुढील सामना 12 जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असेल की, पहिल्या सामन्यातील अपयश विसरून सुरेश रैना आगामी सामन्यात उत्तम कामगिरी करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“लक्षात असूद्या हा कसोटी सामना आहे”, टीकेचा धनी ठरलेल्या पुजाराच्या मदतीला धावून आला भारतीय क्रिकेटर
मुहुर्त लागला! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी कसोटीत बिनबाद खेळली २० षटके
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: कृणाल पंड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोद्याची विजयी सुरुवात