क्रिकेट सामन्यांदरम्यान अनेकदा असे काही घटना घडतात, ज्यांची कुणी अपेक्षाही केलेली नसते. मात्र, नंतर सर्वत्र त्याच गोष्टीच्या चर्चा सुरू होतात. आताही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये असेच काहीसे झाले आहे. बीसीसीआयच्या देशांतर्गत टी20 स्पर्धेत म्हणजेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बुधवारी (दि. 12 ऑक्टोबर) अनुभवी आणि ज्युनिअर खेळाडूंमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
ही घटना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत ड गटातील सौराष्ट्र आणि बडोदा (Saurashtra And Baroda) संघातील सामन्यादरम्यान घडली. या सामन्यादरम्याान भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) आणि शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) या दोघांमध्ये वाद झाला. मात्र, मैदानावर उपस्थित असणाऱ्या पंचांनी या दोघांना एकमेकांपासून दूर सारत कडक शब्दात चेतावणी दिली.
शेल्डनशी भिडला अंबाती रायुडू
सौराष्ट्र संघाच्या फलंदाजीच्या 9व्या षटकात बडोदा संघाचा कर्णधार अंबाती रायुडू फलंदाज शेल्डन जॅक्सन (Ambati Rayudu And Sheldon Jackson) याच्यावर भडकला. त्याने चेंडू खेळण्यास उशीर लावल्यामुळे रायुडू काहीतरी बोलला. त्यानंतर शेल्डनही प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आला. इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि नंतर पंचांनी रायुडूला स्पष्टपणे चेतावणी देत सावध राहण्यास सांगितले.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1580112537265541121?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1580112537265541121%7Ctwgr%5E93c059e969e93f728642d5a61360f502f6844e67%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-syed-mushtaq-ali-trophy-2022-ambati-rayudu-and-sheldon-jackson-were-involved-in-a-heated-exchange-during-the-smat-4733665.html
व्हिडिओत स्पष्ट दिसते की, रायुडूने श्लेडनला कशाप्रकारे उकसवले आणि त्यानंतर तो पुढे येऊन बाचाबाची करू लागला. त्यांच्यातील वाद वाढू नये म्हणून पंचांनी आणि मैदानावर उपस्थित खेळाडूंनी त्यांच्यामध्ये येऊन हा वाद मिटवला.
सामन्याबद्दल थोडक्यात
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. सौराष्ट्र संघाविरुद्ध बडोदा संघाला 4 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. प्रथम फलंदाजी करताना मितेश पटेल आणि विष्णू सोलंकी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बडोदा संघाने 4 विकेट गमावत 175 धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्र संघाने समर्थ व्यासच्या धमाकेदार 97 धावांच्या खेळीच्या जोरावर 19.4 षटकातच 6 विकेट्स गमावत आव्हान पूर्ण केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ते दोघं वनडेत पंतची जागा घेऊ शकत नाहीत’, भारतीय दिग्गजाने कुणाबद्दल केले मोठे वक्तव्य?
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नाही तसलं बोलला इंग्लंडचा दिग्गज, वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात