---Advertisement---

SMAT 2024; अभिषेक शर्मापासून मोहम्मद शमीपर्यंत स्टार खेळाडू ॲक्शनमध्ये, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना

On: शनिवार, नोव्हेंबर 23, 2024 8:05 AM
---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची 17वी आवृत्ती आज (23 नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहे. यावेळी या स्पर्धेत एकूण 38 संघ सहभागी होत असून त्यांची विविध गटात विभागणी करण्यात आली आहे. टूर्नामेंटमधील बड्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय टी20 संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या हार्दिक पांड्याशिवाय, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल मोठ्या खेळाडूंमध्ये खेळताना दिसणार आहेत. या सर्वांची नावे आगामी आयपीएल 2025 मेगा लिलावात देखील समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत या सर्व खेळाडूंसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ज्यामध्ये पहिला सामना गतविजेता पंजाब आणि बंगाल यांच्यात राजकोटच्या मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेत श्रेयस अय्यर मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ज्यात त्याचा पहिला सामना गोवा संघाशी होणार आहे. रणजी करंडक खेळणाऱ्या सर्व 38 संघांना 5 वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले असून त्यामध्ये 8 संघांना 3 गटात आणि 7 संघांना 2 गटात ठेवण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या तामिळनाडू संघाला ब गटात स्थान मिळाले आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे सर्व गट

अ गट – बंगाल, पंजाब, बिहार, राजस्थान, हैदराबाद, मेघालय, मध्य प्रदेश, मिझोराम.

ब गट – बडोदा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, सौराष्ट्र, सिक्कीम, त्रिपुरा.

क गट – अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, झारखंड.

गट ड – आसाम, रेल्वे, चंदीगड, पुद्दुचेरी, विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड.

गट ई – गोवा, मुंबई, केरळ, सेवा, महाराष्ट्र, नागालँड, आंध्र.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. तर बाद फेरीचे सामने 3 डिसेंबरपासून खेळवले जातील. तर अंतिम सामना 15 डिसेंबरला होईल. दिवसाचा पहिला सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल, तर दिवसाचा शेवटचा सामना दुपारी 4.30 वाजता खेळवला जाईल. चाहते स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. जिओ सिनेमा ॲपवर सर्व सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग केले जाईल. जे चाहते त्यांच्या मोबाइल आणि स्मार्ट टीव्हीवर विनामूल्य पाहू शकतात.

हेही वाचा-

जॉश हेझलवुडने चक्क इतक्यावेळा विराट कोहलीला बाद केले, किंगचा लाजिरवाणा रेकाॅर्ड!
आयसीसी स्पर्धा भारत-पाकिस्तानमध्ये होऊ नयेत, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IND vs AUS; पंतने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---