भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाला. मालिकेत पराभव झाला असला तरीही भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनसाठी ही मालिका खास ठरली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यातून टी नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने उत्कृष्ट कामगीरी केली आणि भारताने या मालिकेत एकमेव विजय मिळवला.
त्यानंतर दोन दिवसात लगेचच नटराजनचे भारताकडून टी20 क्रिकेटमध्येही पदार्पण झाले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 पदार्पण करताना त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
त्याच्या या कामगिरीबद्दल भारताच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने टी नटराजनचे तोंडभरून कौतुक केले केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्याची तुलना भारताचा माजी दिग्गज गोलंदाज झहीर खानशीही केली आहे.
….तशीच कामगीरी नटराजन कोहलीच्या नेतृत्वात करू शकतो-घावरी
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू कर्सन घावरी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “झहीर खानने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात ज्या प्रकारची कामगिरी केली, तशीच कामगीरी टी नटराजन विराट कोहलीच्या नेतृत्वात करू शकतो. कोहली जबरदस्त कर्णधार आहे आणि मला आशा आहे की तो टी नटराजनला प्रोत्साहित करेल आणि त्याला बरेच काही शिकवेल. तो सातत्याने चांगली कामगिरी करत राहिल्यास दीर्घकाळ भारतासाठी खेळेल. भारतासाठी तो एक जबरदस्त खेळाडू असल्याचे सिद्ध होऊ शकेल.”
पदार्पणाच्या सामन्यात घेतली विकेट
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अखेरच्या वनडे सामन्यातून 2 डिसेंबरला टी नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने उत्तम कामगिरी बजावली. पॉवरप्लेमध्येच त्याने भारतीय संघाला यश मिळवून दिले होते.
सुरुवातीच्या दोन्ही वनडे सामन्यात भारतीय संघ पॉवरप्लेमध्ये गडी बाद करण्यात अपयशी ठरला होता.
A brilliant moment for the debutant #AUSvIND pic.twitter.com/50dJEoCL4i
— cricket.com.au (@cricketcomau) December 2, 2020
आम्हाला नटराजनसारख्या खेळाडूंची गरज- शार्दूल
भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही टी नटराजनचे कौतुक केले. तो म्हणाला की, “नटराजन एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये सातत्याने यॉर्कर चेंडू फेकले. त्याने या सामन्यात शानदार पुनरागमन केले. यामुळे तो उच्च दर्जाचा खेळाडू आहे हे दर्शवते. आम्हाला अशाच खेळाडूंची गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
ट्रेंडिंग लेख –
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण