---Advertisement---

कमाल! भुवनेश्वर कुमारनंतर ‘असा’ पराक्रम करणारा टी नटराजन दुसराच भारतीय

On: शुक्रवार, जानेवारी 15, 2021 7:26 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून(१५ जानेवारी) सुरु झालेल्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय क्रिकेट संघात दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी या कसोटीतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नटराजन कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा ३०० वा खेळाडू तर सुंदर ३०१ वा खेळाडू ठरला. याबरोबरच नटराजनसाठी कसोटी पदार्पण हे खुपच खास ठरले. नटराजनने या कसोटीत एक विक्रम केला.

ब्रिस्बेन कसोटी हा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना आहे. त्यामुळे एकाच दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा नटराजन पहिला भारतीय खेळाडू ठरला. विशेष म्हणजे त्याने ४४ दिवसांच्या कालावधीत तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. याआधी असा पराक्रम कोणालाही करता आला नव्हता.

त्यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे त्याने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी केली. क्रिकेटच्या एकाच हंगामात (२०२०-२१) तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये पदार्पण करणारा नटराजन भुवनेश्वरनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे.

मॅथ्यू वेड पहिली कसोटी विकेट – 

नटराजनने या सामन्यात ऑस्ट्रेलियचा फलंदाज मॅथ्यू वेडने बाद करत पहिली कसोटी विकेट घेतली. त्याच्या गोलंदाजीवर वेडचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला. त्यामुळे वेडला ८७ चेंडूत ४५ धावा करुन विकेट गमवावी लागली. त्यापाठोपाठ लगेचच ६६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर टी नटराजनने शतकवीर मार्नस लॅब्यूशेनलाही झेलबाद केले. त्यामुळे नटराजनसाठी त्याचे कसोटी पदार्पण लक्षात राहिल, असेच राहिले.

महत्त्वाच्या बातम्या –

Video : आणखी दुखापती नको रे बाबा! रोहित पृथ्वी शॉमुळे जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला

काय सांगता? फक्त एका चेंडूत काढल्या २८६ धावा, वाचा कधी झाला ‘हा’ अनोखा विक्रम

काय सांगता! एकाच दिवशी २ कसोटी सामने २ देशांविरुद्ध खेळणारा जगातील एकमेव संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---