---Advertisement---

स्वागत नहीं करोगे? गावी परतल्यानंतर टी नटराजनची जंगी मिरवणूक, व्हिडिओ पाहून खूश व्हाल

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 7:13 PM
---Advertisement---

मंगळवारी(१९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी ऑस्ट्रेलिया दौरा संपला. त्यानंतर भारतीय खेळाडू गुरुवारी (२१ जानेवारी) मायदेशात परतले आहेत. मायदेशात परतल्यानंतर प्रत्येक खेळाडूने जंगी स्वागत करण्यात आले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज टी नटराजनचेही तमिळनाडूमधील त्याच्या गावी चिन्नप्पांपट्टी, सालेम येथे मिरवणूक काढून जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. सध्या त्याच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही त्याच्या स्वागताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने लिहिले आहे की ‘स्वागत नहीं करोगे? (स्वागत करणार नाही का?) हा भारत आहे. इथे क्रिकेट फक्त खेळ नाही, त्यापेक्षाही खूप काही आहे. नटराजनला त्याच्या सालेम जिल्ह्यातील त्याच्या चिन्नप्पांपट्टी येथे जंगी स्वागत झाले. काय अफलातून कहानी आहे.’

या व्हिडिओमध्ये दिसते की नटराजनच्या गळ्यात मोठा हार घालण्यात आला असून त्याची खुल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात येत आहे. तसेच आजूबाजूचे लोक त्याच्यां मोबाईल कॅमेरात त्याची एक झलक कैद करत आहेत.

नटराजन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन्ही क्रिकेट प्रकारामध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय –

नटराजनने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. तो एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. खरंतर त्याची या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. मात्र, भारतीय संघाचे खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला पदार्पणाची संधी मिळाली.

या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने १ वनडे, ३ टी२० आणि १ कसोटी सामना खेळताना एकूण ११ विकेट्स घेतल्या.

आयपीएल २०२० मुळे प्रकाशझोतात – 

टी नटराजन आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान प्रकाशझोतात आला होता. त्याने या हंगामात १६ आयपीएल सामन्यांत १६ बळी घेतले असून या दरम्यान त्याची सरासरी ३१.५ अशी होती. त्याने एका हंगामात सर्वाधिक ६५-७० यॉर्कर चेंडू फेकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---