---Advertisement---

भारताचा ‘हा’ गोलंदाज दुखापतीतून सावरला, पुन्हा केली सरावाला सुरुवात

On: रविवार, मे 16, 2021 8:43 PM
---Advertisement---

गेल्या काही महिन्यात टी नटराजनने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली होती. विशेषतः ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यात आणि कसोटी सामन्यात देखील दमदार प्रदर्शन केले. त्यामुळे आता त्याला सातत्याने भारतीय संघात स्थान मिळेल अशी आशा होती.
पण यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला दुखापत झाल्याने पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाहेर व्हावे लागले. इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेसाठी देखील त्याची निवड होऊ शकली नाही. मात्र आता त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली आहे.

नटराजनने स्वतःच दिली माहिती
टी नटराजन आयपीएल मध्ये सनरायझर्स हैद्राबादच्या संघाकडून खेळतो. मात्र यंदाच्या हंगामात तो केवळ सामने खेळू शकला. त्यानंतर गुढघ्याची दुखापत बळावल्याने त्याला पूर्ण आयपीएल मधून बाहेर व्हावे लागले. त्यानंतर नटराजनने गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करून घेतली.

आता या शस्त्रक्रियेनंतर नटराजन दुखापतीतून सावरतो आहे. त्याने आता पुन्हा एकदा व्यायामाला आणि सरावाला देखील सुरुवात केली आहे. याची माहिती नटराजननेच दिली. त्याने इंस्टाग्रामवर एक व्यायाम करतांनाचा व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली. या व्हिडिओला त्याने ‘मी पूर्वीपेक्षा आता अधिक मजबूत होतो आहे’, अशी कॅप्शन दिली.

https://www.instagram.com/p/CO6p7KIl2Sd/?utm_source=ig_embed&ig_rid=54a8e7fc-c744-48ab-8604-77479f29103b

दरम्यान, सनरायझर्स हैद्राबादसाठी मागील हंगामात केलेल्या दमदार कामगिरीमुळेच नटराजनला भारतीय संघात स्थान मिळाले होते. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याने या संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी केली होती. कसोटी मालिकेत शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. आता इंग्लंड दौर्‍यावरील भारतीय कसोटी संघात त्याची निवड झाली नसली तरी जुलै महिन्यात श्रीलंके विरूद्धच्या मालिकेद्वारे नटराजन पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या ५ खेळाडूंना मानले जाते सर्वाधिक आळशी क्रिकेटपटू; २ भारतीयांचाही समावेश

कौंटी क्रिकेटमध्ये या गोलंदाजांची शानदार कामगिरी, एकाच डावात घेतल्या ९ विकेट्स

नाचा रे! शुबमन गिल अन् कमलेश नागरकोटीसह थिरकले राणा दाम्पत्य, एकदा पाहाच हा डान्स व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---