टी. नटराजन हे नाव मागील २ महिन्यांपासून सर्व क्रिकेट रसिकांमध्ये प्रसिध्द झाले आहे. सुरुवातीला आयपीएल मध्ये आपल्या यॉर्कर गोलंदाजीने व मागील काही सामन्यांत ऑस्ट्रेलिया मधील आपल्या कामगिरीमुळे सर्वच क्रिकेट पंडितांची त्याने वाहवा मिळवली आहे. अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी देखील त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. भारताच्या टी-२० विश्वचषक मोहिमेच्या दृष्टीने देखील नटराजन संघासाठी महत्वपूर्ण घटक असेल, असे तज्ञांचे मत आहे.
शांत स्वभावामुळे आला चर्चेत
याच दरम्यान नटराजन आपल्या मैदानावरील शांत स्वभावामुळे देखील चर्चेत राहिला. सामान्यतः वेगवान गोलंदाज विकेट घेतल्यानंतर आपल्या देहबोलीतून आक्रमकता व्यक्त करत असतात. नटराजन मात्र विकेट घेतल्यानंतर स्मित हास्य करत असताना दिसून येतो. नटराजनला या बद्दल मुलाखतीत विचारले असता त्याने सांगितले, “अनेक लोक मला हाच प्रश्न विचारतात की तू मैदानात आक्रमकता दाखण्या ऐवजी शांत का असतो. खरतर माझा स्वभाव लहानपणापासूनच असा आहे. मला नाही माहित विकेट घेतल्यानंतर आक्रमकता कशी दाखवतात . मी आक्रमकता दाखवण्याऐवजी केवळ स्मित हास्य करतो.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी
नटराजनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वन डे व टी २० सामन्यांत उत्तम गोलंदाजी केली आहे. भारताच्या मुख्य संघात समावेश नसलेल्या नटराजनला वरुण चक्रवर्ती च्या दुखापती मुळे टी २० संघात स्थान मिळाले .तसेच नवदीप सैनीला झालेल्या दुखापतीमुळे तिसऱ्या वन डे सामन्यात त्याला संधी मिळाली. शेवटच्या वन डे सामन्यात त्याने २ विकेट मिळवल्या व ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत ६ फलंदाजांना त्याने बाद केले.
संबंधित बातम्या:
– नटराजन या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
– दिलदार पंड्या! स्वतःला मिळालेला मालिकावीराचा पुरस्कार दिला नटराजनला
– काय कमाल कामगिरी आहे; भारतीय वेगवान गोलंदाजाचे वॉर्नरकडून तोंडभरून कौतुक






