तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने इंडियन प्रीमियम लीगच्या 13 व्या हंगामात आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. अखेरच्या षटकांत तो खूपच प्रभावी ठरला.यादरम्यान यॉर्कर चेंडूने त्याने टिच्चून मरा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. एवढेच नव्हे, तर भारतीय संघ निवड समितीने त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी संघात स्थान दिले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा टी नटराजनचा समावेश कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट संघात करण्यात आला नव्हता. मात्र, संघात निवड झालेला फिरकीपटू वरून चक्रवर्तीला दुखापत झाल्यामुळे त्याच्या टी नटराजनची टी20 संघात वर्णी लागली.
तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पाठीत वेदना जाणवल्यामुळे पर्यायी गोलंदाज म्हणून टी नटराजनला भारतीय वनडे संघात स्थान देण्यात आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन वनडे सामन्यात नवदीप सैनी प्रभावी ठरू शकला नाही. त्यामुळे अखेरच्या वनडे सामन्यात टी नटराजनचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. भारताकडून वनडेत पदार्पण करणारा तो 232 वा खेळाडू ठरला.
भारतीय संघात पदार्पण केल्याबद्दल टी नटराजनने ट्विट करून चाहत्यांचे आभार मानले. त्याने लिहिले की, “देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव शानदार होता. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार. अधिक आव्हानांसाठी मी तयार आहे.”
It was a surreal experience to represent the country. Thanks to everyone for your wishes.
Looking forward for more challenges 🇮🇳 pic.twitter.com/22DlO9Xuiv
— Natarajan (@Natarajan_91) December 3, 2020
तिसऱ्या वनडे सामन्यात नटराजनने शानदार गोलंदाजी करत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत तो कशी कामगिरी करतो हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारताला जोरदार धक्का, रवींद्र जडेजा झाला दुखापतग्रस्त
‘खिशातून हात काढा, भारताचा सामना आहे क्लबचा नाही’, युवराज सिंगकडून युवा खेळाडू ट्रोल
विराटच्या घवघवीत यशात मोलाची कामगिरी बजावणारा ‘हा’ व्यक्ती पुन्हा होणार भारतीय संघात सामील
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर