---Advertisement---

Video: पदार्पणाच्या सामन्यातच नटराजनने उडवला त्रिफळा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

On: बुधवार, डिसेंबर 2, 2020 3:16 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया-भारत दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना कॅनबरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३०२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर ५० षटकात विजयासाठी ३०३ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशाने आणि ऍरॉन फिंच हे दोघे सलामीला उतरले. दोघांनी संयमी सुरुवात केली. फिंचने काही आक्रमक फटके खेळत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रथमच सलामीला उतरलेल्या लॅब्यूशानेला धावा काढणे जिकिरीचे जात होते.

नटराजनने मिळवला पहिला आंतरराष्ट्रीय बळी

अखेर सहाव्या षटकात वनडे पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने लॅब्यूशानेला त्रिफळाचीत करत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपला पहिला बळी मिळवला. लॅब्यूशानेने १३ चेंडूत ७ धावा केल्या. या बळीसह मागील सहा वनडे सामन्यात प्रथमच भारतीय गोलंदाज पहिल्या पावरप्लेमध्ये बळी मिळविण्यात यशस्वी ठरले. यादरम्यानच्या व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

https://twitter.com/urmilpatel21/status/1334046986681671680

ट्विटरवरून चाहत्यांनी केले नटराजनचे कौतुक

नटराजनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळविल्यानंतर, चाहत्यांनी ट्विटरवरून त्याचे अभिनंदन केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने ट्विट करत म्हटले आहे, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुझे स्वागत आहे नटराजन. तू पदार्पणातच मोठा बळी मिळवलाय.’

एका चाहत्याने ट्विट करत नटराजनचे कौतुक करताना लिहिले, ‘मागील सहा वनडे सामन्यात प्रथमच भारतीय संघाचा कोणतातरी गोलंदाज पहिल्या पावरप्लेमध्ये बळी मिळू शकला. सौजन्य- चिनप्पापट्टीचा थंगारसू नटराजन.’

अन्य एका चाहत्याने लिहिले आहे, ‘टी नटराजन दुसऱ्या खेळाडूच्या दुखापतीमुळे संघात निवड झाली. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध दबावाच्या स्थितीत आंतरराष्ट्रीय पदार्पण. आपल्या तिसऱ्या षटकात लॅब्यूशानेचा बळी.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरेच षटक निर्धाव. अप्रतिम नट्टू.’

एका चाहत्याने नटराजनने मिळवलेल्या बळीचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे, ‘नटराजने आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळविला. हा त्याच्यासाठी सर्वात्तम क्षण आहे.’

इतरही अनेक चाहत्यांनी नटराजनच्या कामगिरीविषयी त्याचे कौतुक केले आहे. सुरुवातीला टी२० संघात निवड झालेल्या नटराजनला ऐनवेळी वनडे संघात स्थान मिळाले होते. आज सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते त्याला ‘वनडे कॅप’ प्रदान करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये फलंदाजांच्या नाकीनऊ आलेल्या गोलंदाजाचे टीम इंडियाकडून पदार्पण; कोहलीने दिली पदार्पणाची कॅप

‘तुझा जन्म व्हायच्या आधी मी आंतरराष्ट्रीय शतक ठोकले’, एलपीएलमध्ये ‘या’ खेळाडूवर संतापला आफ्रिदी; पाहा Video

Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक

ट्रेंडिंग लेख-

लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्‍याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू

काय म्हणायचं आता! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मध्ये भारतीय संघाने उभारलेल्या तीन सर्वात ‘निच्चांकी’ धावसंख्या

 लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---