इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील शेवटचा साखळी सामना आठवतोय का? का नाही आठवणार. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. यादरम्यान मुंबईकडून फलंदाजी करणाऱ्या टिम डेविड याने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या ११ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांची बरसात करत ३४ धावा चोपल्या होत्या. त्याच्या या फटकेबाजीमुळे मुंबईला विजय मिळाला होता. हाच फलंदाज आता इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करतोय.
पठ्ठ्याने १० चेंडूत ठोकल्या ५२ धावा
टिम डेविड (Tim David) याने टी२० ब्लास्टच्या एका सामन्यात लंकाशायर (Lancashire) संघाकडून खेळताना अवघ्या ३२ चेंडूत ६६ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकारही लगावले. म्हणजेच, त्याने अवघ्या १० चेंडूत ५२ धावा चोपल्या. लंकाशायर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत २१३ धावांचा डोंगर उभा केला होता. या अव्हानाचा पाठलाग करताना यॉर्कशायर (Yorkshire) संघाला ८ विकेट्स गमावत फक्त २०९ धावाच करता आल्या. त्यामुळे लंकाशायर संघाने ४ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात एकूण ४२२ धावा चोपल्या गेल्या. टिम डेविड याला त्याच्या या आक्रमक फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
https://twitter.com/VitalityBlast/status/1534612210667896833?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1534612210667896833%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-t20-blast-tim-david-played-an-aggressive-innings-lancashire-beat-yorkshire-video-4308429.html
सामन्याचा आढावा
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लंकाशायर संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. फिल सॉल्ट याने १० धावा करून तंबू गाठला. त्यानंतर कीटन जेनिंग्स आणि स्टीव्हन क्राफ्ट यांनी संघाचा डाव सांभाळला. जेनिंग्स याने ४२ धावा, तर क्राफ्ट याने ४१ धावा केल्या. मात्र, यानंतर संघाची गाडी पुन्हा रुळावरून खाली गेली. संघाची धावसंख्या ४ विकेट्स गमावत १०० इतकी झाली. त्यानंतर टिम डेविड आणि कर्णधार डेन विलास यांनी ९६ धावांची जबरदस्त भागीदारी रचत धावसंख्या २००च्या जवळ नेली.
२००हून अधिकच्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा
टिम डेविड आणि डेन विलास यांनी यादरम्यान २००हून अधिकच्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. विलास याने २० चेंडूत नाबाद ४० धावा चोपल्या. यामध्ये १ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, डेविड ३२ चेंडूत ६६ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०६ इतका होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उमरान मलिक पदार्पण करणार? कर्णधार रिषभ पंतने दिले संकेत
पंत कर्णधार बनताच गर्लफ्रेंडचा ‘खास संदेश’ चर्चेत, काय म्हणाली एकदा पाहाच
भविष्यात ‘हा’ फलंदाज बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, हरभजन सिंगने दिले संकेत