fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

लखनऊ | भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जबरदस्त शतकी खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीच्या जिवावर टीम इंडियाने २० षटकांत २ बाद १९५ धावा केल्या.

या शतकी खेळीबरोबर रोहित शर्माने अनेक विक्रम केले. त्यातील निवडक विक्रम असे-

-रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक अर्थात ४ शतकं करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापुर्वी कॉलीन मुनरो आणि रोहित शर्माच्या नावावर ३ शतकांसह संयुक्तपणे हा विक्रम होता.

-नाबाद १११ धावा या भारताकडून टी२०मधील दुसऱ्या वैयक्तिक सर्वाच्च धावा आहेत. यापुर्वी रोहितने २०१७मध्ये ११८ धावांची खेळी केली होती.

-रोहित शर्माने एकट्याने टी२०मध्ये ४ शतक केली आहेत. तर सर्व भारतीय फलंदाजांनी मिळुन ३ टी२० शतक केली आहेत.

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२५पेक्षा अधिक षटकार मारणारा रोहित शर्मा ७वा खेळाडू बनला. ३४३ षटकारांसह धोनी या यादीत ५व्या स्थानी आहे तर ४७६ षटकारांसह ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी अव्वल स्थानी आहे.

-एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर. त्याने यावर्षी ६६ षटकार मारले आहेत. तर यापुर्वीही हा विक्रम त्याच्याच नावावर होता. २०१७मध्ये त्याने ६५ षटकार मारले होते.

-आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये रोहितने तब्बल १९वेळा ५० किंवा अधिक धावा केल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम विराट कोहली आणि रोहितच्या नावावर संयुक्तपणे होता.

-भारतात सर्वाधिक टी२० षटकार मारण्याचा पराक्रम आता ३३ षटकारांसह रोहितच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम ३२ षटकारांसह युवराज सिंगच्या नावावर होता.

-आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दोन शतके ठोकणारा रोहित हा जगातील पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल

गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद

आजपासून हे स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नावाने ओळखले जाणार

सचिनप्रमाणेच विराटलाही भारतरत्न द्या, पहा कुणी केली मागणी

You might also like