---Advertisement---

हद्दच केली! रिषभ पंतचा पाठलाग करता-करता उर्वशी रौतेलाने ऑस्ट्रेलिया गाठली

On: रविवार, ऑक्टोबर 9, 2022 1:11 PM
rishabh pant Urvashi Rautela
---Advertisement---

मागच्या दोन महिन्यांमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिबुड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्याविषयी अनेक बातम्या समोर आल्या आहेत. दोघांनी एकमेकांचे नाव न घेता वेगवेगळ्या पोस्ट देखील केल्या आहेत. पंत सध्या भारतीय संघासोबत आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. अशातच उर्वशी देखील आता त्याच्या पाठोपाठा ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याचे दिसत आहे. 

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यादीत दोन पोस्ट विमानातील आहेत आणि तिने यात अशी माहिती देखील दिली आहे की, ती आता ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. उर्वशीने रविवार, 8 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर एकूण सहा पोस्ट शेअर केल्या. तिने विमानातील एका पोस्टवर असेही लिहिले आहे की, “ती स्वतःच्या प्रेमाचा वाठलाग करत ऑस्ट्रेलियाला चालली आहे.” याच पार्श्वभूमीवर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी यांच्यातील प्रेमप्रकरणाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. अनेकांच्या मते उर्वशी पंतच्या मागेच लागली आहे.

https://www.instagram.com/p/CjeLHACBue7/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CjeEKkFhTN9/?utm_source=ig_web_copy_link

उर्वशीने शेअर केलेल्या दोन पोस्टखाली कॅप्शनमध्ये तिने शायरी शेअर केली आहे. एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कोई इतना बेदर्द कैसे बन जाए कि किसी की तड़प पर किसी को तरस ही ना आए..!!” तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ”आईना आज फिर रिश्वत लेता पकड़ा गया, दिल में दर्द था और चेहरा हंसता हुआ पकड़ा गया।” उर्वशीच्या या शायहीनंतर पंतच्या चाहत्यांकडून मजेदार कमेंट्स येत आहेत. अनेकांनी लिहिले आहे की, उर्वशीला पंतची आठवण येत आहे, तर काहींच्या मते पंतने तिच्यावर एवढा अन्याय करायला नको आहे. पंतने उर्वशीला किमान भेटले तरी पाहिजे. पोस्टवर अशाच प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/CjeN1hEBlwz/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CjeNn7_hQIW/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उर्वशी आणि पंतचे हे प्रकरण उर्वशीच्या एका विधानामुळे सुरू झाले. यावेळी तिने पंतचे नाव न घेता ‘मिस्टर आरपी’ आणि ‘छोटू भैया’ असे शब्द त्याच्यासाठी वापरले होते. त्यानंतर उर्वशी आशिया चषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित राहिली. नंतर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ती पंतची माफी मागताना दिसली. पण हे प्रकरण तरीही शांत झालेले दिसत नाही. आथा उर्वशी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन काय करते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO| बाबर आझमची फिफ्टी नाहीतर डेवॉन कॉनवेची फिल्डींग होतेयं ट्रेंड; एकदा पाहाच
INDvSA: रांची वनडेपूर्वी ‘या’ खेळाडूला आठवला धोनी! म्हणाला, ‘त्याच्यासारखा अनुभवी…’  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---