तिरंगी मालिकेमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZvPAK)यांच्यात शनिवारी (8 ऑक्टोबर) ख्राइस्टचर्च क्रिकेट ग्राउंडवर टी20 सामना खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने 6 विकेट्सने जिंकला, मात्र यावेळी पाकिस्तान नाहीतर न्यूझीलंडचा खेळाडू सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. त्याने केलेल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ख्राईस्टचर्चमध्ये क्षेत्ररक्षणाचे एक चांगले दृष्य आपल्याला पाहायला मिळाले. पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती तेव्हा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि अष्टपैलू शादाब खान हे दोघे खेळपट्टीवर तग धरून उभे होते. तेव्हाच 12व्या षटकात टीम साऊदी गोलंदाजी करायला आला. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर शादाबने ऑफ स्टंपला स्कूप शॉट खेळला. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना विकेटकीपिंग करणाऱ्या डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने जवळपास 50 मीटर अंतर धावत जात चौकार अडवला आहे. त्याच्या या भन्नाट क्षेत्ररक्षणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
या सामन्याच्यावेळी समालोचकही चकीत झाले आहे, जेव्हा कॉनवेने विकेटकीपिंग करताना सीमारेषेकडे जाताना चेंडू योग्यरित्या अडवला आहे. यावेळी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने कॉनवे (36) आणि मार्क चॅपमन (32) यांच्यामुळे 20 षटकात 8 विकेट्स गमावत 147 धावासंख्या उभारली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम याची गोलंदाजी प्रभावशाली ठरली. त्याने 4 षटकात 20 धावा देत फिन ऍलन आणि कॉनवे या महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
https://twitter.com/PrimeVideoIN/status/1578679713014636544?s=20&t=Q_RRk-ABCJPdi6qgE08B5g
पाकिस्तानने हे लक्ष्य 18.2 षटकात 4 विकेट्स गमावत पार केले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान (4) आणि शाह मसूद (0) यांनी लवकरच आपली विकेट गमावली, मात्र बाबर नाबाद 79 धावा करत एक बाजूला टीकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. शादाबने 34 धावा केल्या.
बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड याच्यात टी20 सामन्याची तिरंगी मालिका सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिले स्थान काबीज केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: रांची वनडेपूर्वी ‘या’ खेळाडूला आठवला धोनी! म्हणाला, ‘त्याच्यासारखा अनुभवी…’
चाहती पण मुलीसारखीच असते ना! मिलरच्या ‘त्या’ पोस्टने सगळेच फसले, पण नवीन धडाही मिळालाय, वाचा सविस्तर
चेंडू 110 मीटर गेला, तरीही टिम डेविडचे नाही भरले मन; म्हणाला, ‘पुढच्या वेळी…’





