रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत माहिती दिली आहे आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२ साठी संघाची रचना अगदी स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. द्रविड यांनी म्हटले आहे की, त्यांना आणि रोहितला विश्वचषकात संघ संयोजन काय असावे? हे माहित आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी२० मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले की, “मला वाटते की मी, रोहित, निवडकर्ते आणि व्यवस्थापन यांच्याकडे संघ रचनेबाबत स्पष्ट चित्र तयार आहे. मला नाही वाटत की एक निश्चित फॉर्म्युला तयार आहे. परंतु आम्ही टी२० विश्वचषकासाठी संयोजन आणि समतोल याबद्दल अगदी स्पष्ट आहोत. आम्ही संघ तयार करत असून खेळाडूंच्या कामाचा ताण कमी करत आहे. ऑस्ट्रेलियासाठी आम्हाला कोणते कौशल्य हवे आहे, त्याच्याच आधारे आम्ही पुढे जात आहोत. यावर आमचे स्पष्ट मत आहे. आम्ही कोणतेही निश्चित निकष लावलेले नाहीत, पण आम्हाला सर्वांना योग्य संधी द्यायची आहे.”
भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतींमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपासून दूर होते. त्यामुळे टी२० विश्वचषक लक्षात घेऊन द्रविड सर्व खेळाडूंना तयार ठेवणार आहेत. ते म्हणाले, “आपण ज्या युगात जगत आहोत, त्या काळात हे सोपे नाही. आम्हाला स्वतःला फक्त १५ खेळाडूंपुर्ते मर्यादित ठेवायचे नाही. आम्हाला खेळाडूंना संधी द्यायची आहे. आम्ही विश्वचषक खेळायला जाईपर्यंत आमच्या काही खेळाडूंना किमान १० ते २० सामन्यांचा अनुभव असेल, याची आम्हाला खात्री आहे. यामुळे रोहितला त्याच्यासोबत खेळण्याची, त्याला हव्या त्या प्रकारची गोलंदाजी करण्याची संधी मिळेल, पण खेळाडूंना दुखापत झाल्यास आम्हाला थोडा ‘बॅक अप’ देखील हवा आहे.”
आयपीएल लिलावात सर्वात महाग विकल्या गेलेल्या इशान किशनबद्दल बोलताना ते म्हणाले, “इशानची त्याची क्षमता आणि कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आली. ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान यांचेही आम्ही एका सामन्याच्या आधारावर मूल्यांकन करत आहे. ते येथे आहेत कारण त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि ते त्यास पात्र होते.”
दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी फिनिशरची भूमिका बजावत असलेल्या व्यंकटेश अय्यरवर बोलताना द्रविड म्हणाले, “आम्हाला माहित आहे की तो त्याच्या आयपीएलमध्ये ओपनरची भूमिका निभावतो. पण आमच्या परिस्थितीनुसार आम्ही त्याला कोणत्या प्रकारची भूमिका देऊ इच्छितो, याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट आहे. आमच्याकडे पहिल्या तीनमध्ये त्याच्यासाठी जागा नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यासमोर आव्हान ठेवले आहे. आम्ही त्याच्यावर एक भूमिका सोपवली आणि प्रत्येक वेळी त्याने चांगली खेळी दाखवली, तसेच त्याने सुधारणा केली जी पाहून खरोखर आनंद झाला.”
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट खेळण्यासाठी तरसतोय रैना, ‘अनसोल्ड’ राहिल्यानंतर बीसीसीआयकडे केली इमोशनल अपील
आयपीएमधून बीसीसीआयला मिळणार ५०० अब्ज रुपये? मोठ-मोठ्या कंपन्या शर्यतीत