पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यातील उपांत्य फेरीचा पहिला सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरूवारी (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचे डेविड मलान आणि मार्क वूड खेळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. आता थेट कर्णधार जोस बटलर यानेच त्याला पूर्णविराम दिला आहे.
इंग्लंडचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात स्फोटक फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो फलंदाजी करण्यासही आला नाही. यानंतर वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) हा ऍडलेड ओव्हलमध्ये भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून बाहेर झाला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, शरीरात त्रास होत असल्यामुळे त्याने सराव सत्रात भाग घेतला नाही. स्पर्धेतील सर्वात खतरनाक गोलंदाज वूड हा स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि त्याने चार सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.
या रिपोर्ट्स समोर येत असताना मलान आणि वूड भारताविरुद्ध खेळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या. त्याला जोस बटलर (Jos Buttler) याने महत्वाचे विधान करत थांबवले आहे. त्याने म्हटले, “मलान आणि वूड यांच्या खेळण्यावर शंका आहे, मात्र सामन्याच्या दिवशी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आम्हाला आमच्या मेडिकल स्टाफवर विश्वास आहे. खेळाडू फिट राहावे हीच आमची इच्छा आहे.”
“संघातील प्रत्येक खेळाडूंवर आमचा विश्वास आहे. पाकिस्तान दौऱ्यात आम्ही अधिक युवा खेळाडूंना संधी दिली होती. त्यांनी प्रदर्शनही चांगले केले. फिल सॉल्ट हा उत्तम माइंडसेटचा खेळाडू आहे, खासकरून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये. तो असा खेळाडू आहे ज्याचे लक्ष्य संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर असते,” असेही बटलर पुढे म्हणाला.
या स्पर्धेत इंग्लंडने ओव्हलवर एकही सामना खेळलेला नाही. दुसरीकडे भारताने याच मैदानावर सुपर 12मध्ये बांगलादेशला पराभूत केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ आहेत भारताचे कमनशीबी खेळाडू, ज्यांना नाही मिळाली टी-20 विश्वचषकात संधी
पंतला खेळवल्यामुळे सेहवाग नाराज, सांगितले कार्तिकला खेळवण्याची का आहे गरज