आगामी टी-20 विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया यावर्षीच्या टी-20 विस्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे. परंतु त्याआधी भारतीय संघ अडचणीत दिसत आहे. जुलै महिन्यात भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत खेळल्यानंतर वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याला गंभीर दाखापत झाली होती. त्यानंतर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला देखील दुखापत झाल्याचे समोर आले होते. तसेच टी-20 विश्वचषक अवघ्या एक महिन्यावर आला असताना रविंद्र जडेजा देखील दुखापतग्रस्त झाला आहे. असे असले तरी, संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे.
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत एकूण 4 विकेट्से घेतल्या होत्या. त्यानंतर हर्षल दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. असे असले तरी, त्याने मधल्या काळात स्वतःची फिटनेस पुन्हा मिळवल्याचे दिसत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या या व्हिडिओत तो सराव आणि नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ भारतीय संघाची चिंता काही प्रमाणात नक्कीच कमी करेल. हर्षल शेवटच्या षटकांमध्ये किफायतशीर गोलंदाजी करू शकतो आणि टी-20 विश्वचषक खेळला, तर त्याक्याकडून संघाला अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
https://www.instagram.com/reel/CiR2TIbjntD/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, हर्षलने जरी नेट्समध्ये गोलंदाजी करायला सुरुवात केली असली, तरी संघाचे इतर काही इचक काही गोलंदाज मात्र अद्याप फिटनेस मिळवून शकले नाहीत. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या सुरू असलेल्या आशिया चषकापूर्वी दुखापतीच्या कारमास्तव संघातून बाहेर झाला आहे. बुमराह टी-20 विश्वचषकापूर्वी फिट होईल असा अंदाज बांधला जात होता, परंतु अद्याप याविषयी कसलेही संकेत मिळाले नाहीत. तसेच महत्वाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषकात चांगला खेळत होता, परंतु अत्याला सराव सत्रात झालेल्या दुखापतीमुळे आशिया चषक आणि सोबतच टी-20 विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. भारताला आगामी विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिका खेळायच्या आहेत. या मालिकेत हर्षल आणि बुमराह उपस्थित राहतील अशी आशा सर्वांनाच लागली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक जिंकणारा संघ होणार मालामाल, कोटींमध्ये मिळणार प्राइज मनी; उपविजेत्यांनाही…
गजब बेइज्जती! कर्णधाराला दुर्लक्षित करत रिझवानने घेतला रिव्ह्यू; आझम म्हणाला, मी कॅप्टन आहे
आशिया चषक| फायनलपूर्वी पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ धाकड गोलंदाज दुखापतीतून बरा






