भारतीय संघाने २००७ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात मिळवलेला विजय प्रत्येक क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाही. पाकिस्तानच्या मिसबाह उल हक (misbah ul haq) याने महत्वाच्या वेळी श्रीसंतच्या हातात झेल दिला आणि भारताने पहिला टी-२० विश्वचषक नावावर केला. आता जवळपास १४ वर्षांनातर पहिल्यांदाच मिसबाह उल हकने मान्य केले आहे की, त्याने तो शॉट अतिआत्मविश्वासात खेळला होता, ज्यामुळे महत्वाच्या वेळी स्वतःची विकेट गमावली होती.
टी-२० विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती, तर भारताला विजयासाठी एक विकेट हवी होती. मिसबाह उल हक चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि खेळपट्टीवर उपस्थित होता. भारतासाठी जोगिंदर शर्मा गोलंदाजीसाठी आला होता. पाकिस्तानचे पारडे जड वाटत होते, पण तितक्यात मिसबाहने स्वतःची विकेट गमावली. स्कूप शॉट खेळण्याच्या नादात त्याने श्रीसंतच्या हातात सोपा झेल दिला होता. भारताने या सामन्यात पाच धावांनी विजय मिळवला होता.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद यूसुफ यांच्यासोबत चर्चा करताना मिसबाह या अंतिम सामन्याविषयी व्यक्त झाला आहे. पाकिस्तानी चाहत्यांचे नेहमीच असे मत आले आहे की, संघ हा सामना जिंकू शकत होता, जर मिसबाहने हा शॉट खेळला नसता. मिसबाहने त्यावेळी स्वतःची विकेट गमावली नसती, तर विजयासाठी पाकिस्तानचे पारडे नक्कीच जड होते. पाकिस्तान संघ जिंकला असता किंवा नाही, ही गोष्टी निश्चित सांगता येणार नाही. पण मिसबाहने जुन्या सहकाऱ्यांसोबत बोलताना मान्य केले की, तो शॉट शक्यतो त्याने अतिआत्मविश्वासात खेळला होता.
शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना मिसबाहने हा शॉट खेळण्यामगचे कारण सांगितले. तो म्हणाला की, “अनेकदा त्याने या शॉटवर चौकार मारले होते. त्याच विश्वचषकात अनेकदा क्षेत्ररक्षक असतानाही त्याने हा शॉट मारला होत. या शॉटवर त्याचा विश्वास होता की, यावेळीही सहजपणे याला खेळेल. कारण फाइन लेगचे खेळाडू खूप वरती थांबले होते, पण असे झाले नाही. मिसबाहने हा शॉट खेळला आणि झेल देऊन बसला. श्रीसंतने चपळाई दाखवत सहजपणे झेल पकडला.” आयसीसीने आयोजित केलेला हा पहिला टी-२० विश्वचषक होता आणि भारताने त्यावर नाव कोरले.
महत्वाच्य बातम्या –
PHOTO: केवळ क्रिकेटच नाहीतर ‘या’ खेळाचाही उस्ताद आहे संजू; पाहा व्हायरल फोटो
दबंग दिल्लीचा दबदबा सुरूच! गुजरातला मात देत काबीज केले पहिले स्थान
व्हिडिओ पाहा –