रविवारी (२४ ऑक्टोबर) रात्री टी-२० विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. या सामन्याची दोन्ही देशांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर विरोधी असल्यामुळे दोन्ही संघांवर सामन्याचा दबाव असणार आहे. असे असले तरी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी (२३ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना सामन्याविषयी कसलाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले होते.
अशातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल तनवीरने विराटविषयी एक वक्तव्य केले आहे. सोहेलच्या मते विराट या सामन्यापूर्वी दबावात असणार आहे.
माध्यमांशी बोलताना सोहेल तनवीर म्हणाला की, भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच हाय वोल्टेज सामना असतो, यादरम्यान खेळाडूंवर निश्चितच देबाव असतो, त्यांनी तो स्वीकार करो किंवा न करो. कागदावर भारत एक चांगला संघ आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर एक अतिरिक्त दबाव असणार आहे, पत्रकार परिषदेत विराट कोहली स्वत:ला या दबावापासून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो त्याला जाणवत असणार.
सामन्यापूर्वी शनिवारी विराट पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, संघाचा तयारी आणि मानसिकता वेगळी नाहीये आणि आमचा दृष्टिकोन अन्य सामन्यांप्रमाणेच राहील. विराट पुढे म्हणाला होता की, माझ्यासाठी हा क्रिकेटच्या कोणत्याही अन्य सामन्यापेक्षा वेगळा नाहीये. होय, स्टेडियममध्ये वातावरण वेगळे असेल, पण आमची मानसिकता वेगळी नाहीये. आमची तयारीही वेगळी नाहीये आणि खेळाप्रती आमचा दृष्टिकोनही निश्चित वेगळा नाहीये.
भारतीय संघ आतापर्यंत वनडे आणि टी२० विश्वचषकात एकूण १२ वेळा पाकिस्तानसोबत खेळला आहे आणि यापैकी एकदाही पाकिस्तानला विजय मिळवला आलेला नाही. असे असले तरी विराटने यापूर्वीच्या आकड्यांना काहीही महत्व नसल्याचे सांगितले होते. विराट म्हणाला होता की, अशाप्रकारच्या गोष्टी केवळ खेळाच्या दबाव वाढवतात. आम्ही संघात याबाबत कधीच चर्चा केलेली नाही की, आपले रेकॉर्ड काय आहे किंवा आपण काय मिळवले आहे. महत्वाचे हे आहे की, तुम्ही विरोधकांची विचार न करता त्यादिवशी कशी तयारी करता आणि असे प्रदर्शन करता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारतीय खेळाडूंना झोपेच्या गोळ्या द्या’; मोठ्या सामन्यापूर्वी बरळला पाकिस्तानचा शोएब अख्तर
‘रनसंग्रामा’आधी मेंटॉर धोनी लागला कामाला, कर्णधारासह संघाला दिले धडे; पाहा व्हिडिओ
सरावात दिसला ‘किंग कोहली’चा धमाका; व्हिडिओ पाहून उडेल पाकिस्तानचा थरकाप






