भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित टी२० विश्वचषकातील सामना सुरू होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या सामन्यासाठी खेळाडूंसह संपूर्ण जगभरातील चाहते सज्ज झाले आहेत. त्याच वेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो अतिशय गंभीरतेने सराव करताना दिसून येत आहे. त्याच्यासमोर गोलंदाजी करत असलेल्या सर्व भारतीय गोलंदाजांचा त्याने खरपूस समाचार घेतलेला दिसला.
विराटचा व्हिडिओ व्हायरल
सध्या भारतीय क्रिकेट संघ दुबई येथील आयसीसी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सराव करत आहे. तेथील एक व्हिडीओ नुकताच समोर आला. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली हा अगदी तन्मयतेने सराव करताना दिसला. यामध्ये विराटने भारताच्या सर्व गोलंदाजांचे चेंडू खेळून काढले. भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, राहुल चहर व मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांसह काही नेट बॉलर्सचा देखील त्याने चांगलाच समाचार घेतला.
युएईत अशी आहे विराटची आकडेवारी
जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराटने युएईत २८ टी२० सामने खेळताना पाच अर्धशतकांसह ७७८ धावा बनविल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ३३.७२ व स्ट्राईक रेट ११९.७९ असा राहिला. या मैदानांवर त्याची सर्वोच्च धावसंख्या ९० धावांची राहिली आहे.
भारतासमोर विजयी लय कायम राखण्याचे आव्हान
भारतीय संघाचा व पाकिस्तानचा आत्तापर्यंत टी२० विश्वचषकात पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या सर्व वेळी भारतीय संघाने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. भारताने २००७ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानलाच पराभूत करत पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१२, २०१४ व २०१६ असे सलग तीन वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
पाकिस्तान विरुद्ध संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व वरूण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/adil-rashid-bowls-best-bowling-spell-in-t20-world-cup/
https://mahasports.in/ganga-aarti-for-team-india-at-dashashwamedh-ghat-before-ind-vs-pak-match/






